मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला...

Koffee With Karan 7: अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला...

Koffee With Karan शोमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीने हजेरी लावली होती. यावेळी ईशान खट्टरने पहिल्यांदाच अनन्या पांडेबाबत संवाद साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 सप्टेंबर-   बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण' सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येक सीजनप्रमाणे या सातव्या सीजनमध्येसुद्धा बॉलिवूड कलाकार आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत मोठ मोठे खुलासे करत आहेत. नुकतंच शोमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीने हजेरी लावली होती. यावेळी ईशान खट्टरने पहिल्यांदाच अनन्या पांडेबाबत संवाद साधला आहे.

'कॉफी विथ करण' मध्ये कतरिना, ईशान आणि सिद्धांतने प्रचंड धम्माल केली आहे. करणने या तिघांना अनेक खाजगी प्रश्नदेखील विचारले होते. परंतु या तिघांनीही आपल्या हटके अंदाजात याची उत्तरे दिली आहेत. दरम्यान शाहिद कपूरचा भाऊ आणि अभिनेता ईशान खट्टरला अनन्या पांडेबाबतदेखील प्रश्न विचारण्यात आले होते. यावर ईशानने स्पष्ट उत्तर दिलं आहे. या दोघांनी कधीही आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केलेली नव्हती. परंतु त्यांना बऱ्याचवेळा एकत्र फिरताना पाहण्यात आलं होतं.

'कॉफी विथ करण' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करण जोहरने ईशान खट्टरला प्रश्न विचारत म्हटलं, 'तुम्ही अनन्या पांडेसोबत ब्रेकअप केला आहात?' यावर उत्तर देत ईशान म्हणाला, हे खरं आहे का? तो पुढे म्हणाला, ब्रेकअप कुणी केला याला महत्व नाही. परंतु आता मी एकदम सिंगल आहे हे महत्वाचं आहे'. त्यामुळे अनन्या आणि ईशानचा ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म झालं आहे.

(हे वाचा:Katrina Kaif: 'ही' अभिनेत्री बनणार कतरिना कैफची वहिनी; करण जोहरने केलं कन्फर्म )

तसेच ईशानला अनन्यासोबत आता नातं कसं आहे? याबाबतही विचारण्यात आलं होतं. याबाबत बोलताना ईशानने म्हटलं, 'मला अपेक्षा आहे की आम्ही आयुष्यभर एक चांगले मित्र राहणार. ती खूपच चांगली व्यक्ती आहे. ती फारच गोड आहे. जो कुणी व्यक्ती तिच्या संपर्कात येईल तोही हेच सांगेल. मीडिया रिपोर्टनुसार, ईशान आणि अनन्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. खाली-पिली या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती . परंतु या दोघांनी एका चांगल्या टप्प्यावर एकमेकांच्या सहमतीने ब्रेकअप केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: Ananya panday, Bollywood News, Entertainment, Karan Johar