जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आता थुंकणं पुन्हा सुरू होईल', सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीना टंडनची नाराजी

'आता थुंकणं पुन्हा सुरू होईल', सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीना टंडनची नाराजी

'आता थुंकणं पुन्हा सुरू होईल', सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीना टंडनची नाराजी

सरकारनं दारू आणि पान शॉपबाबत दिलेल्या निर्णयावर अभिनेत्री रवीना टंडननं नाराजी व्यक्त केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : कोरोना व्हायरसनं आता संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात सुद्धा या व्हायरसच्या संक्रमणामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 37 हजारांपेक्षा जास्त लोक या व्हायरसनं संक्रमित झाले आहेत. त्यामुळे आता देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. मात्र यावेळ देशातील वेगवेगळ्या भागांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागून त्या त्या झोननुसार त्या भागांना काही गोष्टींची सूट देण्यात आली आहे. ज्यात दारू आणि पान शॉप पुन्हा एकदा उघडली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नाराजी व्यक्त केली आहे. तिनं ट्विटरवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. रवीनानं ANI चं ट्वीट रिट्वीट केलं आहे. ज्यात देशतील काही भागात दारू आणि पान शॉप पुन्हा सुरू करण्यास परवानगी असल्याचं म्हटलं आहे. रिट्वीटमध्ये रवीनानं लिहिलं, ‘पान/ गुटख्याच्या दुकानांसाठी आनंद व्यक्त करा. खूप छान आता थुंकणं पुन्हा सुरू होईल. कमाल आहे.’ रवीनाच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्येही सलमान खान जिममध्ये गाळतोय घाम, जॅकलीननं शेअर केला PHOTO

जाहिरात

रवीना टंडन व्यतिरिक्त जावेद अख्तर यांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिलं, लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं पुन्हा सुरू केल्यास विनाशकारी परिणाम समोर येतील. आधीच सर्व्हेनुसार सध्याच्या काळात घरगुती हिंसाचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा निर्णय लहान मुलं आणि महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू शकतो.

सरकारच्या निर्णयानुसार ग्रीन झोनमधील दारूची दुकानं उघडली जाणार आहेत. मात्र त्यासाठी काही नियम बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. ग्राहकांना सराकारनं दुकानापासून ठरवून दिलेलं अंतर पाळावं लागणार आहे. तसेच एका वेळी एका दुकानावर पाच पेक्षा जास्त ग्राहक उभे राहू शकणार नाहीत. (संपादन- मेघा जेठे.) ‘दर 2 महिन्यांनी मीडिया किम यांना मृत घोषित करते’, बॉलिवूड कलाकाराचा संताप VIDEO : ‘रामायण’ मालिकेनं रचला जागतिक इतिहास, दूरदर्शननं मानले प्रेक्षकांचे आभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात