मुंबई, 03 मे : कोरोना व्हायरस सध्या देशभरात थैमान घातलं आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींसोबत बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा लॉकडाऊनचं काटेकोर पालन करताना दिसत आहे. नेहमीच फिटनेससाठी जिममध्ये जाणाऱ्या या सेलिब्रेटींची जिम मात्र या लॉकडाऊनमुळे बंद पडली आहे. त्यामुळे काही सेलिब्रेटी घरच्या घरी व्यायाम करत आहेत. मात्र सलमान खान मात्र लॉकडाऊनमध्येही जिममध्ये घाम गाळत आहे. त्याचा एक फोटो अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे जो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सलमान खान जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सलमानची पिळदार बॉडी पाहायला मिळत आहे. यावरुन लक्षात येत की सलमान लॉकडाऊनमध्ये त्याचा सर्वाधिक वेळ घालवत आहे. अर्थात जिमसाठी सलमानला कुठे जाण्याची गरज नाही त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर सुसज्ज अशी जिम आहे. VIDEO : भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवणाऱ्यांची ऐश्वर्यानं क्षणात केली बोलती बंद सलमानचा हा फोटो शेअर करताना जॅकलीननं लिहिलं, गिफ्ट की कठोर मेहनत. मला वाटतं तो प्रत्येक दिवशी त्या गोष्टीचे आभार व्यक्त करत असतो. तो त्याचा सन्मान करतो जे त्याला देवानं दिलं आहे. असं बरंच काही आहे सांगण्यासारखं पण तुम्ही सुरक्षित राहा. सलमानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
सलमाननं या अगोदरही एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एका बाजूला सलमान खान जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे तर दुसरीकडे जॅकलीन गुपचूप त्याचा फोटो काढताना दिसत आहे. सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’नंतर दूरदर्शन दाखवणार गाजलेल्या आणखी दोन धार्मिक मालिका
लॉकडाऊनमुळे सलमान सध्या त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर अडकला आहे. तर त्याचे वडील मुंबईतील त्यांच्या घरी अडकले आहे. लॉकडाऊनमुळे सलमान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मागच्या काही दिवसांपासून तो सतत त्याच्या चाहत्यांना सोशल डिस्टंसिंगसाठी जागरुक करताना दिसत आहे. सलमान सोबत त्याच्या बहिणी आणि त्यांची फॅमिली, जॅकलीन फर्नांडिस, सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतुर आणि काही स्टाफ या फार्म हाऊसवर अडकले आहेत. प्रियांका चोप्राचं 2014 मध्येच झालं होतं लग्न? काय आहे Viral Photoचं सत्य