लॉकडाउनमध्येही अमिताभ बच्चन यांच्यासोबत KBC खेळण्याची संधी, असं करा रजिस्ट्रेशन

लॉकडाउनमध्येही अमिताभ बच्चन यांच्यासोबत KBC खेळण्याची संधी, असं करा रजिस्ट्रेशन

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन असतानाही बिग बी अमिताभ बच्चन प्रेक्षकांसाठी KBC चा 12 वा सीझन घेऊन येत आहेत. असं करा रजिस्ट्रेशन

  • Share this:

मुंबई, 3 मे : सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati )पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचं वातावरण असतानाही बिग बी अमिताभ बच्चन प्रेक्षकांसाठी KBC चा 12 वा सीझन घेऊन येत आहेत. या नव्या सीझनचं रजिस्ट्रेशन येत्या 9 मे पासून सुरू होणार आहे. KBC च्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की, रजिस्ट्रेशन ते स्पर्धकांची निवड ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यावेळी शोची टॅगलाइन सुद्धा नेहमीपेक्षा खूपच वेगळी आहे. प्रेक्षकांना लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या नकारात्मकतेमधून खंबीरपणे बाहेर पडण्याची प्रेरणा देते. 'हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं' अशी नव्या सीझनची टॅगलाइन आहे.

22 मे पर्यंत चालू असेल रजिस्ट्रेशन, वाचा काय आहे प्रक्रिया

KBC12 ची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 22 मे पर्यंत असणार आहे. यात अमिताभ बच्चन रोज रात्री 9 वाजता सोनी चॅनेलवर एक प्रश्न विचारतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला SMS किंवा सोनी लिव या अॅपवरुन द्यायचा आहे. प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्यांना यातून निवडलं जाईल आणि त्यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्यात येईल. प्रोसेसच्या तिसऱ्या टप्प्यात निवडलेल्या स्पर्धकांची एक सामान्य ज्ञानाची परिक्षा घेतली जाईल ज्याचा व्हिडीओ बनवून स्पर्धकांना तो सोनी लिव अॅपवरुन पाठवायचा आहे. त्यानंतर या स्पर्धकांची व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुलाखत घेतली जाईल.

VIDEO : भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवणाऱ्यांची ऐश्वर्यानं क्षणात केली बोलती बंद

अशी मिळाणार KBC खेळण्याची संधी

वरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्पर्धकाला KBC 12 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यावेळची खास गोष्ट ही आहे की या शोच्या प्रोमो शूटपासून ते स्पर्धकांच्या निवडीपर्यंतची संपूर्ण प्रोसेस घरी बसल्या डिजिटल माध्यातून होणार आहे. रजिस्ट्रेशन प्रोमोचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरुनच शूट केला आहे. ज्याचं डायरेक्शन दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं आहे. त्यांनी एक सॅम्पल व्हिडीओ बिग बींना पाठवला त्यावरुन बिग बी प्रोमो व्हिडीओचं शूट केलं आहे.

(संपादन- मेघा जेठे.)

ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या पत्नी नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या...

प्रियांका चोप्राचं 2014 मध्येच झालं होतं लग्न? काय आहे Viral Photoचं सत्य

First published: May 3, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या