जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kishori Shahane: बापरे! किशोरी शहाणेंच्या पापण्यांना हे काय झालं? भाषाही ओळखू येईना, पाहा VIDEO

Kishori Shahane: बापरे! किशोरी शहाणेंच्या पापण्यांना हे काय झालं? भाषाही ओळखू येईना, पाहा VIDEO

Kishori Shahane: बापरे! किशोरी शहाणेंच्या पापण्यांना हे काय झालं? भाषाही ओळखू येईना, पाहा VIDEO

किशोरी शहाणे यांचा हा अंदाज कधीच पाहिला नसेल!. त्यांच्या नव्या व्हिडिओची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 19 जुलै: किशोरी शहाणे (kishori shahane instagram) या मराठीतील एक जेष्ठ अभिनेत्री आहेत. किशोरी यांनी आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे केले आहेत. वयाची पन्नाशी गाठूनसुद्धा त्यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. सध्या मात्र त्यांच्या एका रीलबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. किशोरी सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. त्यांचा चाहतावर्ग बराच मोठा असून त्यांनाही किशोरी यांचे धमाल व्हिडिओ रील्स बघायला मजा येते. त्यांनी नुकत्याच एका व्हिडिओमध्ये वापरलेला फिल्टर भलताच विनोदी असून त्यावर कमाल प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर असणारा एक फिल्टर त्यांनी वापरला असून त्यात पापण्यांचा आकार भलामोठा होताना पाहायला मिळत आहे. तसंच कुठल्याशा फॉरेन लँग्वेजमध्ये या संवाद साधताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, “ओळख ही भाषा कोणती आहे”. यावर अनेक चाहते भरभरून रिस्पॉन्स देताना दिसत आहेत. एक युजर लिहितो, “कोणती भाषा होती ते नाही कळलं डोक्यावरून गेलं पण तुम्हाला बघून छान वाटलं” तर दुसऱ्या युजरने अमेरिकन की कोरियन असं म्हणत भाषा ओळखायचा प्रयत्न केला आहे.

जाहिरात

किशोरी या कायमच असे धमाल व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचा मुलगा बोबो सुद्धा त्यांची साथ देताना दिसून येतो. किशोरी आणि बॉबी यांनी मिळून एका ट्रेंडिंग गाण्यावर ताल धरत धमाल उडवून दिल्याचं सुद्धा समोर येत आहे.

किशोरी सध्या एका हिंदी मालिकेत काम करत आहेत. त्यांच्या अभिनयाचं कौशल्य आजही नावाजलं जातं. किशोरी या मागच्या काळात बिग बॉस मध्ये सुद्धा दिसून आल्या होत्या. हे ही वाचा- Neel Salekar: ‘भाडिपा’ फेम अभिनेत्याने केलं जगातभारी हटके काम; ‘या’ रेट्रो गाडीची केली खरेदी किशोरी या आजही नृत्य आणि फिटनेस अशा अनेक बाबींमध्ये बऱ्याच सक्रिय असतात. त्यांनी आजवर स्वतःच्या तब्येतीकडे बरंच लक्ष दिलं आणि त्याचमुळे आज त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे आणि ते कायमच किशोरी यांना सपोर्ट करताना दिसून येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात