मुंबई 19 जुलै: भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपा या मराठी युट्युब चॅनेलची चर्चा तर सगळीकडे होत असते. याच धमाल गॅंगमधील एक अभिनेता आणि यशस्वी influencer नील सालेकरने एक जगतभारी गोष्ट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. बाजरात मिळणाऱ्या अनेक ब्रँडेड गाड्या सोडून नीलने भन्नाट गाडी घेतल्याचं समोर येत आहे. नीलने स्वतःच्या कष्टातून पहिली चारचाकी गाडी खरेदी केल्याचं समोर आलं आहे. आणि दरवेळीच स्वतःच्या हटके अंदाजने लक्ष वेधून घेणाऱ्या नीलने यावेळीही अशीच काहीशी कामगिरी केली आहे. त्याने चक्क क्लासिक असणारी मारुती 800 ही गाडी विकत घेतली आहे. मारुती 800 डिंकी 1985 असं या गाडीचं मॉडेल असून सध्या त्याने केलेल्या हटके निवडीचं प्रचंड कौतुक होत आहे. नीलचा चाहतावर्ग सुद्धा बराच मोठा आहे. त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या त्याच्या ‘ओरेग ज्यूस गॅंग’ने या नव्या ऑरेंज रंगाच्या मारुती 800 गाडीचं दणक्यात स्वागत केलं आहे. नीलचा चाहतावर्ग ऑरेंज ज्यूस गॅंग नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या व्हिडिओमधील हा शब्द त्यांनी डोक्यावर उचलून धरला आणि आता चाहते या नव्या मेम्बरला ही डोक्यावर उचलून धरताना दिसत आहेत. नील हा एक यशस्वी अभिनेता आणि कन्टेन्ट क्रिएटर आहे. त्याचे इन्स्टाग्राम रिल्स प्रचंड प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे त्याला नवी ओळख सुद्धा मिळाली आहे. नुकताच नीलने एक मिलियन फॉलोअर्सचा एकदा पूर्ण केला असून तो हळूहळू एक एक यशाचा टप्पा गाठताना दिसत आहे. हे ही वाचा- Jug Jug Jeeyo साठी नीतू कपूरनी घेतले एवढे पैसे; सर्वात महाग ठरले अनिल कपूर इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून नील कायम मोठमोठ्या बॉलिवूड आणि मराठी स्टारसोबत छोटे विनोदी व्हिडिओ शूट करत असतो. एका मराठमोळ्या कन्टेन्ट क्रिएटरला मिळणारा हा प्रतिसाद लाजवाब आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. नीलचं स्वतःच युट्युब चॅनेल असून त्याची बायको श्रेया आणि आई सुद्धा कधीतरी त्याच्या रिल आणि व्हिडिओमध्ये दिसत असतात.
नील हा भाडिपामध्ये काम करत असताना अनेक विडिओमध्ये दिसून आला होता. त्यानंतर हिंग पुस्तक तलवार या वेबसिरीजमध्ये सुद्धा तो पाहायला मिळाला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याने केलेल्या व्हिडिओला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्याने केलेले काही व्हिडिओ बरेच viral झंझले. अशा पद्धतीने तो कन्टेन्ट क्रिएशनकडे वळला. सध्या तो बरेच कष्ट करून यशस्वी होताना पाहायला मिळत आहे.