मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मिरर सेल्फी घेत Khushi Kapoor ने शेअर केले बेडरुमचे इनसाइड PHOTOS

मिरर सेल्फी घेत Khushi Kapoor ने शेअर केले बेडरुमचे इनसाइड PHOTOS

Khushi Kapoor

Khushi Kapoor

बोनी कपूर आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर(Khushi Kapoor ) बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 20 डिसेंबर: बोनी कपूर आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर(Khushi Kapoor) बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. नेहमी आपल्या बोल्ड फोटोशुटने चर्चेत असणारी खुशी कपूर सध्या तिच्या बेडरुमच्या इनसाइड फोटोमुळे चर्चेत आली आहे. मिरर सेल्फी घेत खुशीने आपल्या चाहत्यांना आपली बेडरुम दाखवण्याचा(Khushi Kapoor shared a picture on Instagram on Sunday to show off her brown bodycon and her bedroo) प्रयत्न केला आहे.

खुशी नेहमीच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि ग्लॅमरच्या बाबतीत अनेकांना मात देते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच प्रतिसाद देतात.

भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! Bajrangi Bhaijaan 2 लवकरच येतोय भेटीला

बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली खुशी

खुशीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. बॉडीकॉन ड्रेसपरिधान केला आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा स्टनिंग लूक तिने मिरर सेल्फी घेत आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. पण या सेल्फीमध्ये खुशीने आपल्या बेडरुमची झलक दाखवली आहे.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिच्या शूज कलेक्शनने चाहत्यांचे लक्ष अधिक वेधले आहे. फोटोमध्ये दिसते की खुशीने आपल्या अतरंगी श्यूजसाठी एक मोठे कपाट केले आहे. तसेच तिच्या मागे तिचा लाडका डॉगीदेखील दिसत आहे.

यापूर्वीही तिने आपल्या बेडरुमचे काही फोटो शेअर केले होते. त्यावेळी तिने मी माझ्या बेडरूमची प्रिन्सेस अशी कॅप्शन दिली होती.

न्यूयॉर्कमधील स्टार्सबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये खुशीने एका सेमेस्टरच्या अ‍ॅक्टिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला असून त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवीला करण जोहरने लाँच केले होते. खुशीला देखील करणच लाँच करणार अशी चर्चा सध्या रंगली आहे.

खुशी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.

First published:

Tags: Entertainment, Janhvi kapoor, Shridevi