Home /News /entertainment /

भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! Bajrangi Bhaijaan 2 लवकरच येतोय भेटीला

भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! Bajrangi Bhaijaan 2 लवकरच येतोय भेटीला

Bajrangi Bhaijaan

Bajrangi Bhaijaan

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

    मुंबई, 20 डिसेंबर: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी खुशखबर आहे. सलमानचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान'चा सीक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत स्वत: सलमान खानने घोषणा केली आहे. मुंबईतील (Mumbai) आरआरआर (RRR) कार्यक्रमादरम्यान 'बजरंगी भाईजान' या हिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच, त्याने विजयेंद्र प्रसाद यांनी सिक्वेलची पटकथा आधीच लिहिली आहे, असा खुलासाही यावेळी केला आहे. Salman Khan के फैंस के लिए बड़ी Good News! Bajrangi Bhaijaan 2 की स्क्रिप्ट हो चुकी है पूरी यावेळी एसएस राजामौली, जेआर एनटीआर, आलिया भट्ट, राम चरण आणि करण जोहर यांच्या उपस्थितीत होते. बजरंगी भाईजान हा चित्रपट 17 जुलै 2015 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजानमध्ये सलमान खान आणि करीना कपूरसरह नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय ,बालकलाकार हर्षालीचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटानं भारतात 300 कोटींची कमाई केली होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या