मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दीपिका पादुकोणने शकुन बत्राच्या अनटाइल्ड फिल्मचे BTS PICS केले शेअर, उद्या करणार मोठी घोषणा

दीपिका पादुकोणने शकुन बत्राच्या अनटाइल्ड फिल्मचे BTS PICS केले शेअर, उद्या करणार मोठी घोषणा

दीपिकाने शकुन बत्रासोबत(Shakun Batra) तिच्या अनटाइल्ड चित्रपटाचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) देखील दिसणार आहेत.

मुंबई, 19 डिसेंबर- दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिचा आगामी चित्रपट 83 (83 Movie) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चांगलीच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात दीपिका पुन्हा एकदा पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. दुसरीकडे, दीपिकाने शकुन बत्रासोबत(Shakun Batra) तिच्या अनटाइल्ड चित्रपटाचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) देखील दिसणार आहेत. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. आता दीपिका पादुकोणने एका पोस्टद्वारे चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती दिली आहे.

दीपिका पदुकोणने चित्रपटाच्या सेटवरून स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत, अनन्या पांडेसह चित्रपटाच्या इतर कलाकारांसह दिसत आहे. फोटो शेअर करताना दीपिका पदुकोणने माहिती दिली आहे की, तिच्या आगामी चित्रपटाबाबत उद्या मोठी घोषणा होणार आहे.

वाचा-लग्नानंतर कतरिना पहिल्यांदा सलमानसोबत 15 दिवसांसाठी जाणार 'या' ठिकाणी

दीपिका तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'थोडी वाट पहावी लागली. पण... कधी कधी, तुम्ही एखाद्या गोष्टीची जितकी जास्त प्रतीक्षा करता तितकी तिची प्रशंसा करता! इथेही तेच सिद्ध होईल अशी आशा आहे. मला अशा गोष्टीचा भाग मिळण्याची संधी मिळाली जी वास्तवात खरोखर जादुई आहे.

दीपिका तिच्या पोस्टमध्ये पुढे माहिती दिली आहे की, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उद्या म्हणजेच २० डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. ती लिहिते- ' माझ्या अंतःकरणातील प्रेम आणि कृतज्ञतेसह, मी माझ्या प्रेमाचे श्रम तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही... उद्याच्या घोषणेसाठी कनेक्ट रहा!'

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Deepika padukone, Entertainment