मुंबई, 26 जून- कन्नड सुपरस्टार यश आणि त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीचं नाव चाहत्यांना सांगितलं. एका सुंदर व्हिडिओद्वारे यशने मुलीचं नाव सर्वांसोबत शेअर केलं. यश आणि राधिकाने त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीचं नाव आयरा यश असं ठेवलं. आता राधिकाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितलं. या स्टार वाइफने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती यशच्या दुसऱ्या बाळाची आई होणार असल्याची घोषणा केली. राधिकाने आयराचा एक क्युट व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली.
गेल्या वर्षी २ डिसेंबरला यश आणि राधिकाला मुलगी झाली. आता ते त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करायला सज्ज झाले आहेत. राधिकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयरा तिच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी फार उत्सुक असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्वॅग से करेंगे उसका स्वागत असं लिहिलेलंही दिसतं. यशच्या सिनेमांबद्दलचं बोलायचं झालं तर सध्या तो केजीएफ चॅप्टर २ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पहिल्या भागाल मिळालेल्या भरघोस यशानंतर चाहत्यांना आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.
कन्नड सिनेसृष्टीतील स्टार कपल राधिका आणि यश पहिल्यांदा एका टीव्ही मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते. नंदागोकुल असं त्या मालिकेचं नाव होते. तर २००८ मध्ये शशांक मोग्गीना यांच्या मनसू या सिनेमातून सिनेसृष्टीत एकत्र पदार्पण केलं होतं. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर यश आणि राधिका पंडितने २०१६ मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.
अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी