मुंबई 4 जुलै: ‘क्योकी सास भी कभी बहु थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जायची. जवळपास एक दशक या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मल्टिस्टारर मालिकेनं एकता कपूरसोबतच इतर अनेक कलाकारांना खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आणलं. केतकी दवे (Ketki Dave) या देखील यांपैकीच एक होत्या. परंतु ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केतकी दवे यांनी मालिका सोडल्यामुळं त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. काही प्रेक्षक तर निर्मात्यांवर नाराज देखील झाले होते. परंतु आज 21 वर्षानंतर त्यांनी मालिका सोडण्याचं खरं कारण आपल्या चाहत्यांना सांगितलं.
राहुल गांधींमुळे बिग बी आणि सोनिया गांधींची मैत्री तुटली; पुस्तकाद्वारे केला मोठा दावा
केतकी दवे या गुजराती मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. प्रामुख्याने त्यांनी साकारलेल्या विनोदी व्यक्तिरेखा तुफान गाजल्या. ‘क्योकी सास भी कभी बहु थी’मध्ये त्या दक्षा भाभी ही भूमिका साकारत होत्या. आपल्या कॉमिक टायमिंगमुळे त्या एखाद्या रडक्या सीनमध्ये देखील हास्य फुलवत असत. त्यांचा अर.ररर..ररर हा डायलॉग त्यावेळी खूप गाजला होता. परंतु काही काळातच त्यांनी मालिका सोडली. नुकतीच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.
राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, 5 जणांवर गुन्हा दाखल
त्या म्हणाल्या, “क्योकी सास भी कभी बहु थी या मालिकेनं मला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर मला अनेक चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. त्या भूमिका साकारण्याची देखील माझी इच्छा होती. कारण मला बराच काळ एकाच भूमिकेत अडकून राहायचं नव्हतं. शिवाय मालिकेत माझा वापर केवळ विनोद करण्यासाठी केला जात होता. त्या कॅरेक्टरमध्ये जराही खोली नव्हती. अनेकदा मी केलेल्या सीनचा मुख्य पटकथेही काहीही संबंध नसायचा. त्यामुळं मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय योग्य होता. कारण त्यानंतर मला आणखी काही प्रयोग माझ्या अभिनय शैलीत करता आले.”
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.