जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचे नियम नाही का?’; केदार शिंदेचा रोखठोक सवाल

‘राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचे नियम नाही का?’; केदार शिंदेचा रोखठोक सवाल

‘राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचे नियम नाही का?’; केदार शिंदेचा रोखठोक सवाल

नियम केवळ सर्वसामान्य जनतेलाच लागू पडतात का? राजकीय नेत्यांच्या मागे गर्दी चालते का? असा रोखठोक सवाल मराठी दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यानं सरकारला केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 28 एप्रिल**:** कोरोना (coronavirus) विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. कोरोनामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. (lockdown rules) शिवाय लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे. (lockdown in Maharashtra) मात्र हे नियम केवळ सर्वसामान्य जनतेलाच लागू पडतात का? राजकीय नेत्यांच्या मागे गर्दी चालते का? असा रोखठोक सवाल मराठी दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यानं सरकारला केला आहे. नेमकं काय म्हणाला केदार**?** केदारनं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे राजकीय नेत्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणला, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!” त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.   कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अजय देवगणची धाव; केली कोट्यवधी रुपयांची मदत लॉकडाऊनचे नियम मोडणं पडलं भारी; बॉलिवूड अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक भारतात मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात