मुंबई, 28 एप्रिल: चित्रपट निर्माता आणि सुपरस्टार अजय देवगणला (Ajay Devgan) मितभाषी व्यक्ती म्हणूनही ओळखलं जातं. चाहत्यांसाठी हा कलाकार एक आयकॉन आहे. सध्या अजय देवगण मुंबईतील कोरोना बाधितांना सहाय्य करत आहे. अजयने बीएमसीला तब्बल 1 कोटी रुपयांची मदतनिधी दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी बीएमसी आणि हिंदुजा रुग्णालयाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आयसीयू युनिटच्या उभारणीत अजयने योगदान दिलं आहे. परंतु,स्वभावाप्रमाणेच हे काम तो कोणताही गाजावाजा न करता करत आहे.
मुंबई,नवी मुंबईत सध्या कोरोनाचा (Corona)मोठा हाहाकार पाहायला मिळत आहे. अपुरे बेडस,औषधांचा तुटवडा आदी कारणांमुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीएमसी (BMC)प्रशासन ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि रुग्णांना सुविधा देण्यासाठी युध्द पातळीवर काम करीत आहे. यासाठी बीएमसीला सेलिब्रिटी,उद्योगपती तसेच विविध संस्थांची मदत मिळत आहे.
Well done @ajaydevgn bro Bollywood has always stood by the country whenever a crises comes and all of you have done a wonderful job by helping in the fight against #Covid @akshaykumar bro gave similar help in Delhi & everyone is doing their bit to help our country win this war. pic.twitter.com/C1vCibtj4T
— Vindu Dara Singh (@RealVinduSingh) April 28, 2021
या सर्व पार्श्वभूमीवर सध्या सुपरस्टार अजय देवगण मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा (Medical Facilities)उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेसोबत काम करत आहे. विशेष म्हणजे त्याचे हे काम अतिशय शांतपणे आणि विनाचर्चा सुरु आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मुंबई महापालिका आयुक्त,नगरसेवक आणि अन्य लोक आपत्कालीन सेवांवर लक्ष ठेवण्यासाठी अक्षरशः 24 तास अथक परिश्रम घेत आहेत. याबाबत माहिती मिळताच अजयने देखील स्वयंस्फूर्तीने या कार्यात सहभाग घेतला आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे धारावी (Dharavi)भागाला मोठा फटका बसला होता. यावेळी त्याने धारावीसाठी व्हेटिंलेटर उपलब्ध करुन दिले होते. हेव्हेंटिलेटर या भागासाठी खूपच उपयुक्त ठरले होते. यावेळी अजय देवगण आणि चित्रपटसृष्टीतील त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park)येथे आपत्कालीन वैद्यकीय युनिट (Medical Unit)उभारण्यास बीएमसीला मदत केली आहे.
स्थानिक वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार,बीएमसीने शिवाजी पार्क येथील भारत स्काऊटस आणि गाईड हॉलमध्ये व्हेंटिलेटर्स,आक्सिजन सपोर्ट,आणि पॅरा मॉनिटर्ससह 20 बेडची सुविधा कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी अजयने आपल्या सामाजिक सेवा विभागातील एनवाय फाऊंडेशनच्या (NY Foundation)माध्यमातून निधी दिला आहे.
(हे वाचा: अक्षय कुमारनं केली मोठी मदत; कोरोना रुग्णांना पुरवले Oxygen Concentrator)
अजय देवगण याच्यासह चित्रपट निर्माते आनंद पंडीत,बोनी कपूर,लव्ह रंजन,रजनीश खानुजा,लिना यादव,आशिम बजाज ओटीटी दिग्गज समीर नायर,दिपक धर आणि रिषी नेगी (बंजय एशिया,सेव्हन तौरस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड,उद्योजक तरुण राठी आणि अक्शन डायरेक्टर आर.पी. यादव यांनी बीएमसीच्या व्यवसाय विकास कक्षातील स्माईली अकाऊंटसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
(हे वाचा:‘मला ट्रोलर्सपासून वाचवा’; बिग बॉस फेम अभिनेत्यानं मागितली सायबर पोलिसांकडे मदत )
याबाबत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवक विशाखा राऊत म्हणाल्या की अजय देवगण याने बीएमसीला पाठिंबा दर्शवला ही खूप चांगली बाब आहे. हा हिंदुजा रुग्णालयाचा विस्तारीत कक्ष असेल,असे सीओओ जॉय चक्रवर्ती यांनी सांगितले. या माध्यमातून आपत्कालीन स्थितीत अन्न,औषधे,कपडे आणि मनुष्यबळ पुरवले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Bollywood, Coronavirus, Marathi entertainment