मुंबई 12 जून: सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Karodpati) या कार्यक्रमाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या शो ने आजपर्यंत अनेकांना कधीच न पुरी होणारी स्वप्न पूर्ण करायचं बळ दिलं आहे. या कार्यक्रमात आजपर्यंत आपल्या बुद्धिचातुर्याने प्रश्नांची उत्तर देणाऱ्या मोजक्याच मंडळींना करोडपती होण्याचा बहुमान मिळाला आहे. एकदा हॉटसीट वर बसून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं काय आहे हे प्रत्येकाला अनुभवायचं आहे. पण सध्या या कार्यक्रमाची एक क्लिप खूप viral होत आहे. या कार्यक्रमच चौदावा सीजन (KBC Season 14) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा नवीन प्रोमो सध्या खूप viral होताना दिसत आहे. सोनी वाहिनीच्या सोशल मीडियावरून या प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यात चक्क एका महिला कन्टेस्टंटला रडकुंडीला यायची वेळ आली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून अनेकांची बोलती बंद होते मात्र रडकुंडीला येणारी ही कदाचित पहिलीच महिला स्पर्धक आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ त्या महिला स्पर्धकाला GPS टेक्नॉलिजीवर एक प्रश्न विचारतात आणि चार पर्याय समोर ठेवतात. यातील कोणाकडे GPS टेक्नॉलॉजी आहे? 1.टाईपरायटर 2.टेलिव्हिजन 3. सॅटेलाईट 4.2000 ची नोट महिला स्पर्धक बेधकपणे चौथा पर्याय निवडते आणि तिचं उत्तर चुकीचं ठरत. तेव्हा ती अमिताभ याना म्हणते तुम्ही चेष्टा करताय ना? मी तर हे टीव्हीवर पाहिलं आहे. त्यावर अमिताभ तिची माफी मागतात आणि महिला स्पर्धक रडू लागते. अमिताभ बच्चन यावर स्पष्टीकरण देतात की ज्ञान मिळवा पण ते पडताळून पाहा नाहीतर तुमच्यावर रडायची वेळ येईल.
कोणत्याही प्रश्नउत्तरांच्या खेळात मिळेल त्या गोष्टीतून ज्ञान मिळवणं आवश्यक आहे पण ते ज्ञान किती खरं आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. केबीसी हा शो कायमच ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांचा प्रसार करत आला आहे. या शो चे चौदा सीजन होऊन गेले तरी अजूनही याची लोकप्रियता तितकीच आहे. बुद्धीच्या जोरावर अचूक उत्तर देणाऱ्या हुशार मंडळींसाठी तर हा कार्यक्रम पर्वणीच आहे. यात सामान्य माणसातील असामान्य ज्ञानाचा गौरव होतो आणि त्याच्या जोरावर करोडपती बनण्याची संधी सुद्धा त्यांना मिळते. हे ही वाचा- BREAKING : भारतातली टॉपची फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू केबीसी सीजन 13 मध्ये गीता सिन गौर, हिमांशी बुंदेला, साहिल अहिरराव या तीन स्पर्धकांना करोडपती होण्याचं भाग्य लाभलं होतं. आता येत्या सिजनमध्ये किती स्पर्धक या करोड्पट्टीच्या किताबाचे मानकरी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.