मुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाच्यासोबत KBC खेळताना अनेक स्पर्धकांना स्वतःवर नियंत्रण राहत नाही. अमिताभ यांच्या समोर बसल्यावर जवळपास प्रत्येक स्पर्धक असंच सांगतो की त्याला हे स्वप्न वाटत आहे. काही स्पर्धक हे फास्टेस्ट फिंगर फस्टमध्ये प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन KBC च्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळवतात. मात्र अशावेळी अनेकदा स्पर्धकांची असबंंध वागणूक पाहायला मिळते. 4 ऑक्टोबर प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. फास्टेस्ट फिंगर फस्टमधील प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हॉट सीटवर पोहोचलेल्या उर्मिला धरतवाल यांनी आनंदाच्या भरात एवढे फ्लाइंग किसेस दिले की, शेवटी अमिताभ बच्चननी उर्मिला यांना थांबवलं.
त्यानंतर जेव्हा उर्मिला हॉट सीटवर बसल्या त्यावेळीही त्यांनी अनेक प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली. मात्र अमिताभ यांच्या सुचनेनंतर कधी त्यांनी उत्तरं बदलली तर कधी लाइफलाइन वापरली. असं करत करत त्यांनी 25 लाख जिंकले आणि 50 लाखांच्या प्रश्नांवर त्यांनी खेळ सोडला.
उर्वशी रौतेलाने डान्स करता करता स्वतःच उतरवला टॉप VIDEO VIRAL
अमिताभ बच्चन यांच्या समोर बसल्यानंतरही उर्मिला एवढ्या बेचैन झाल्या होत्या की त्यांना शांत करण्यासाठी बिग बी त्यांना म्हणाले, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. त्यानंतर अमिताभ यांनी उर्मिलांना त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव करून दिली. कारण त्या हॉट सीटवर बसल्यानंतर वेगळ्याच दुनियेत वावरत आहेत असं अमिताभ यांना वाटलं होतं.
VIDEO : रणवीरच्या फॅशनचं करायचं तरी काय? अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली
व्यवसायानं डॉक्टर असलेल्या उर्मिला यांनी अमिताभ यांना म्हटलं की, तुम्ही आज निळा सदरा घातला आहे. मात्र त्यावेळी अमिताभ यांनी पिवळा सदरा घातला होता. हे सर्व पाहिल्यावर अमिताभ यांनी उर्मिलांना खूप समजावलं आणि मग खेळाला सुरुवात केली.
या प्रश्नावर सोडला खेळ
प्रश्न : जम्मू आणि काश्मीरचे कोणते पंतप्रधान जे पुढे जाऊन भारताचे मुख्य न्यायाधीश झाले?
उत्तर : मेहर चंद महाजन
राणादा आणि पाठबाईंचा टीआरपी मीटर पडला; 2 आठवड्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप
उर्मिला यांना KBC मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न
प्रश्न : 1731 मध्ये जोधपुर राज्यातील वृक्षतोड रोखण्यासाठी कोणत्या महिलेनं 3 मुलांसोबत स्वतःच्या प्रश्नांची आहुती दिली?
उत्तर : अमृता देवी
प्रश्न : 1967 मध्ये पहिलं मानवी हृदय प्रत्यारोपण कुठे करण्यात आलं?
उत्तर : केपटाउन
प्रश्न : 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँक यांचं कोणत्या बँकेसोबत विलीनीकरण करण्यात आलं. ज्यामुळे ती तिसरी सर्वात मोठी बँक बनली?
उत्तर : बँक ऑफ बडोदा
प्रश्न : कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्यानं गांधीजींवर अर्धनग्न फकिर अशी टीका केली होती?
उत्तर : विंस्टन चर्चिल
प्रश्न : आधुनिक काळात कोणाला हिंदी साहित्याचा पितामह म्हटलं जातं?
उत्तर : भारतेंदु हरिश्चंद्र
प्रश्न : 1948 ते 56 पर्यंत अस्तित्वात असलेल्या पेप्सू प्रांताच्या राजधानीचं नाव काय? जे पूर्व पंजाबच्या 8 साम्राज्याचं क्षेत्र बनलं होतं?
उत्तर : पटियाला
प्रश्न : आशियातील कोणतं शहर जे 2020 मध्ये ऑलम्पिकचं यजमानपद भूषवणार आहे?
उत्तर : टोकियो
प्रश्न : सुरदास यांच्या भजन, 'मैया मोरी दाऊ बहुत खिजायो' मध्ये दाऊ कोण आहे?
उत्तर : बलराम
प्रश्न : यातील काय गंभीर वर्णांधतेनं पीडित असलेल्या व्यक्तीला दिलं जात नाही?
उत्तर : डीएल
प्रश्न : हेप्टाथलनमध्ये किती प्रतिस्पर्ध्यांचा समावेश होतो.
उत्तर : 7
प्रश्न : दीवार सिनेमात विजयनं कशाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता?
उत्तर : फेकलेले पैसे
प्रश्न : सैंधा आणि काळा हे कोणत्या खाद्याचे 2 प्रकार आहेत?
उत्तर : मीठ
कंगनाच्या बहिणीवर झाला होता अॅसिड अटॅक; धक्कादायक फोटोतून उलगडली कहाणी
================================================================
VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा