मुंबई, 04 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनयासाठी जितका ओळखला जातो त्यापेक्षा जास्त त्याच्या चित्रविचित्र अवतारातील कपड्यांमुळे चर्चेत असतो. कोणताही फॅशन शो असे, रेड कारपेट असो किंवा कार्यक्रम नेहमीच तो आगळ्या वेगळ्या ढंगात हजर असतो. त्याची फॅशन जोकरपेक्षा कमी नसते. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीरचा अवतार पाहून एक लहान मुलगी रडायला सुरुवात करते. रणवीर सिंग एका रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडताना चाहत्यांनी त्याला गराडा घातला. त्यावेळी सेल्फीसाठी एक चाहता त्याच्या लहान मुलीला घेऊन उभा होता. रणवीर जवळ येताच चाहत्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण रणवीरचा अवतार पाहून घाबरलेली चिमुकली वडिलांना बिलगली आणि रडू लागली. खरंतर रणवीरने एक लॉन्ग साइज हुडी घातल्याने तो विचित्र दिसत होता. लाल रंगाचा हुडी आणि डोळ्यावर काळा गॉगल घातला होता. तो एखाद्या कार्यक्रमात जरी आला तरी त्याला ओळखणं मोठ्या माणसांना शक्य होत नाही. त्यातच रात्रीच्या वेळी रणवीरचा हा अवतार पाहून लहान मुलगी रडायला लागली.
आयफाच्या ग्रीन कार्पेटवर रणवीर आणि दीपिकाच्या फॅशनची चर्चा जोरदार रंगली होती. एकीकडे माधुरी दीक्षितच्या रेड गाऊननं सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या तर दुसरीकडे कतरिना कैफच्या मरुन गाऊननं सर्वांची मनं जिंकली. मात्र दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या विचित्र ड्रेसनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाली होती. VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला