मुंबई, 3 ऑक्टोबर : कंगना रनौटची बहीण आणि तिची मॅनेजर रंगोली चंडेल ही अॅसिड अटॅक व्हिक्टिम होती. तिने स्वतःच शेअर केलेल्या धक्कादायक फोटोंतून तिची भीषण कहाणी उलगडली. रंगोली इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकताना ही घटना घडली. ट्विटरवर रंगोलीने शेअर केलेल्या पोस्टमधून नेमकं काय घडलं आणि या धक्क्यातून आपण कसे बाहेर आलो हे तिने सांगितलं आहे. सोशल मीडियावर रंगोलीने काही दिवसांपूर्वी आपले जुने फोटो शेअर केले होते. त्यावर काही यूजर्सने आणखी फोटो शेअर कर असं सांगितलं.
कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिने दोघींचा हा लहानपणचा फोटो शेअर केला आणि त्यावर यूजर्सनी आणखी फोटो शेअर कर असं सांगितलं.
त्यानंतर रंगोलीने आपले आणखी काही फोटो शेअर केले. कॉलेजमध्ये असतानाचा एक फोटो शेअर केल्यानंतर तिने लिहिलं की, “हा फोटो काढल्यानंतर काही वेळातच माझ्यावर अॅसिड अटॅक झाला होता.” हे धक्कादायक वास्तव रंगोलीनेच सांगितल्यानंतर हा हल्ला कसा झाला, तिला काय काय सोसावं लागलं ते समोर आलं. कंगनावरही झाला होता हल्ला “मी त्या मुलाच्या प्रपोजलला नकार दिल्यावर त्यानं एक लीटर अॅसिड माझ्या चेहऱ्यावर उडवलं. मला 54 सर्जरी कराव्या लागल्या. आणि त्याच वेळी माझी बहीण कंगनाला काही कारण नसताना अक्षरशः जीवघेणी मारहाण करण्यात आली”, असं रंगोलीने लिहिलं आहे.
रंगोली त्या वेळी डेहराडूनमध्ये होती. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती, तेव्हाची ही घटना आहे. “माझ्या चेहऱ्याचं काय होणार, सौंदर्य हरपलं म्हणून अनेक लोक हळहळ व्यक्त करतात. पण त्या वेळी हे प्रश्न गौण होते. तुमचे अवयव त्या अॅसिडमध्ये तुमच्या डोळ्यांदेखत अक्षरशः विरघळतात तेव्हाचं दुःख मोठं असतं. 5 वर्षांच्या काळात केलेल्या 54 शस्त्रक्रियांनंतरही डॉक्टर माझा कान वाचवू शकले नाहीत. या हल्ल्यात माझा एक डोळा गेला. रेटिना ट्रान्स्प्लांट केल्यानंतर माझी दृष्टी परत मिळाली. माझ्या शरीराच्या अनेक भागांवरची त्वचा काढून चेहरा वाचवला गेला. एवढंच नाही तर माझा एक स्तनसुद्धा वाईट पद्धतीने खराब झाला होता. त्यासाठीही प्लास्टिक सर्जरी करावी लागली. माझ्या प्रिथूला ब्रेस्ट फीडिंग करताना खूप गुंतागुंत उद्भवली होती”, असं रंगोलीने लिहिलं आहे.
रंगोलीने केलेल्या ट्वीट सीरिजमध्ये तिने या कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी साथ दिली त्याचा उल्लेख केल आहे. आपल्या नवऱ्याचाही उल्लेख केला आहे. “मी तर जगायची आशाच सोडली होती. माझा आताचा नवरा आणि तेव्हा फक्त मित्र असलेल्या या माणसाने माझ्या जखमा धुतल्या. त्यावर फुंकर घातली. तो ऑपरेशन थिएटरबाहेर तासनतास थांबायचा…” असं तिने लिहिलं आहे. हे वाचा - 3 लग्न करूनही ही अभिनेत्री राहतेय एकटी? जाणून घ्या काही माहीत नसलेल्या गोष्टी “या धक्क्यातून बाहेर यायला माझ्या छोट्या बहिणीने - कंगनाने मदत केली, हेही रंगोली लिहिते.”
त्या हल्लेखोराला शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न का करत नाहीस, असं एका यूजरने विचारल्यावर रंगोली सांगते, ‘आता माझा प्राधान्यक्रम वेगळा आहे. माझा नवरा आणि मुलगा यांच्याऐवजी त्या गुन्हेगाराच्या मागे लागावं असं मला वाटत नाही.’ — इतर काही बातम्या कोण आहे ही Nude Yoga Girl ? मलायका अरोरासुद्धा हिला मानते इन्स्पिरेशन SHOCKING! ‘दिग्दर्शकानं माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती’ हॉट सीटवर बसून KBC खेळण्याऐवजी पतीशी भांडू लागली स्पर्धक, वाचा नक्की काय झालं