मुंबई, 10 सप्टेंबर : टीव्हीवरील लोकप्रिय रिअलिटी शो कौन बनेगा करोडपती पुन्हा एकादा चर्चेत आला आहे. कारण या आठवड्याच्या सुरुवातीलाच या शोमध्ये हजेरी लावलेल्या हिमांशू धूरियानं 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. यासोबतच त्यानं या शोमध्ये चालू सीझनमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड बनवले आहेत. मूळचा राय बरेलीचा असलेला 19 वर्षीय हिमांशू एक ट्रेनी पायलट आहे. त्यानं नुकतंच दीड वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी हिमांशूच्या कौटुंबीक जीवनातबाबत काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शोमध्ये हिमांशू त्याची आजी आणि काही मित्रासोबत आला असून आपलं मित्रांशी एक डील झाल्याचं त्यानं शोमध्ये कबुल केलं. या शोमध्ये जिंकलेल्या एकून रक्कमेपैकी तिसरा भाग तो आपल्या मित्रांना देणार आहे. अमिताभ बच्चन यांनी हिमांशूबाबत आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हिमांशू लवकरच कमर्शिअल पायलट होणार आहे मात्र त्याला उंचावर भीती वाटते हे मान्यही केलं. The Sky Is Pink : मुलीला जगवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पालकांची इमोशनल कहाणी
Himanshu Dhuria played brilliantly to reach the 1 Crore question. Will he be able to ace the landing and become our youngest Crorepati? Find out tonight on #KBC, at 9 PM @SrBachchan pic.twitter.com/ynktCMdFPb
— sonytv (@SonyTV) September 9, 2019
हिमांषुने फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये बनवलं रेकॉर्ड हिमांशू KBC च्या या आठवड्याचा पहिला स्पर्धक आहे. त्यानं या शोमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं नवा रेकॉर्ड केला आणि हिमांशू 11 व्या सीझनमधील सर्वात कमी वेळात उत्तर देणारा पहिला स्पर्धक ठरला. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट या राउंडमध्ये हिमांशूनं 2.42 सेकंदात प्रश्नाचं उत्तर दिलं. परदेशात 11 महिने 11 दिवस कॅन्सरवर उपचार घेऊन ऋषी कपूर यांची घरवापसी पहिल्याच प्रश्नासाठी वापरली होती लाइफ लाइन हिमांशूनं त्याच्या पहिल्याच प्रश्नासाठी लाइफ लाइन घेतली होती. या शोमध्ये खरं र सुरुवातीचे प्रश्न हे खूपच सोपे असतात. अशात हिमांशूनं पहिल्या प्रश्नासाठी लाइफ लाइन वापल्यानं सर्वांच्याच भूवया उंचवल्या गेल्या. त्याला विचारण्यात आलेला प्रश्न हा एका वाक्प्रचाराचा भाग होता. हा प्रश्न त्यानं ऑडियन्सच्या मदतीनं पूर्ण केला त्यानंतर त्यानं खूप चांगला खेळ खेळला आणि अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं दिली. आता तो 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे. आली लग्न घटी! श्रीदेवींची नवराई ‘या’ मंदिरात करणार लग्न ============================================================== VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक