परदेशात 11 महिने 11 दिवस कॅन्सरवर उपचार घेऊन ऋषी कपूर यांची घरवापसी

गेल्या एका वर्षात ऋषी यांनी अनेक ट्वीट केले. यात त्यांना घरची ओढ लागल्याचं स्पष्ट दिसत होतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 09:48 AM IST

परदेशात 11 महिने 11 दिवस कॅन्सरवर उपचार घेऊन ऋषी कपूर यांची घरवापसी

मुंबई, 10 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर जवळपास माच्या 1 वर्षापासून परदेशात कॅन्सरवर उपचार घेत होते. काही दिवसापसून ते भारतात परणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते नेमके भारतात कधी परतणार याविषयी कोणालाच माहित नव्हतं. पण आता ऋषी कपूर भारतात परतले असून व्हिडीओ जर्नलिस्ट विराल भयानी यांनी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा एअरपोर्ट व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ऋषी कपूर मागच्या 1 वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरव उपचार घेत होते. बराच काल आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. त्यांना घरची किती आठवण येत आहे हे त्यांच्या पोस्ट वरून दिसून येत असे. त्यामुळे मुंबईत परतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. नीतू आणि ऋषी कपूर एकमेकांचा हात पकडून एअरपोर्ट बाहेर पडले. यावेळी घरी परल्याचा आनंद दोघांच्याही चोहऱ्यावर ओसांडून वाहताना दिसला.

...म्हणून विराट- अनुष्काला म्हटलं जातं स्टायलिश कपल

Loading...

 

View this post on Instagram

 

Welcome back ❤❤❤ #rishikapoor #neetusingh #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मुंबईला परतल्यावर ऋषी कपूर यांनी त्याच्या ट्वीटरवर एक पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला. घरी परतलो, 11 महिने, 11 दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार. अशा शब्दात ऋषी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ऋषी कपूर न्यूयॉर्कला असताना इथे अनेक महत्त्वाच्या घटना घडून गेल्या. एकीकडे ऋषी त्यांच्या आजारावर उपचार घेत होते तर मुंबईत त्यांच्या आईचं कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. आईच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. याशिवाय काही दिवसांनी आरके स्टूडिओही विकावा लागला. यावेळी ते न्यूयॉर्कमध्येच होते.

'फेमिनिझम म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणं नक्कीच नाही...' सोनमची बेधडक मतं

गेल्या एका वर्षात ऋषी यांनी अनेक ट्वीट केले. यात त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजल्याचं सतत दिसत होतं. प्रत्येक ट्वीटमध्ये त्यांनी नीतू यांचं भरभरून कौतुक केलं. ऋषी म्हणाले होते की, 'एवढ्या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे.' मागच्या काळात ऋषी यांना त्यांच्या कामाविषयी अनेकदा चिंता व्यक्त केली होती. मात्र भारतात परतल्यावर लगेच त्यांना कामाला सुरुवात करायची आहे असं त्यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे दोन मोठे प्रोजेक्टही आहेत.

प्रियांका चोप्राच्या नवऱ्यासोबत फोटो काढायला धावली पाकिस्तानी अभिनेत्री, पण...

=================================================================

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 09:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...