आली लग्न घटी! श्रीदेवींची नवराई 'या' मंदिरात करणार लग्न, असा असेल 'जान्हवी कपूर'चा वेडिंग ड्रेस

आली लग्न घटी! श्रीदेवींची नवराई 'या' मंदिरात करणार लग्न, असा असेल 'जान्हवी कपूर'चा वेडिंग ड्रेस

लग्नात काय कपडे घालणार तसेच लग्न कुठे होणार याबाबतची सर्व माहिती जान्हवीनं नुकतीच एका मुलाखतीमध्ये दिली.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. कधी आई श्रीदेवीमुळे तर कधी तिच्या फिटनेस आणि सिनेमांमुळे. जान्हवीनं नुकतंच फॅशन मॅग्झीन ब्रायडल टुडेसाठी फोटोशूट केलं. या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गुपितं उघड केली. तसेच आणि श्रीदेवीबद्दलही अनेक खुलासे केले. याविषयी तिनं तिच्या लग्नाचा प्लान सर्वांशी शेअर केला. यामध्ये ती तिच्या लग्नात काय कपडे घालणार यापासून ते तिचं लग्न कुठे होणार याबाबतची सर्व माहिती जान्हवीनं या मुलाखतीमध्ये दिली.

जान्हवी सांगते, ‘मला आतापासूनच माहीत आहे की, माझं लग्न कुठे होणार आहे. मी माझ्या लग्नात कांजीवरम जरीची साडी नेसणार आहे. माझं लग्न पारंपरिक पद्धतीनं होईल आणि ठिकाण तिरुपती असेल. याशिवाय माझे आवडते दाक्षिणात्य खाद्यपदार्थ इडली-सांभर, दही-भात, खीर यांचा लग्नाच्या मेन्यूमध्ये समावेश असेल.’

'फेमिनिझम म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणं नक्कीच नाही...' सोनमची बेधडक मतं

जान्हवी पुढे म्हणाली, ‘मला लग्न खूप धामधूमीत आणि आधुनिक पद्धतीनं करायचं नाही. मला असं काहीतरी करायचं आहे, जे खरं असेल. माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींच्या उपस्थितीत आणि त्यांच्याशी हे सर्व जोडलेलं असावं.’ जान्हवीनं यावेळी तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही अनेक खुलासे केले. आपल्या आईविषयी बोलताना जान्हवी म्हणाली, ‘आई पुरुषांविषयीच्या माझ्या निर्णयावर सहमत नसे.’ तु आई श्रीदेवीसोबत तुझ्या लग्नाच्या प्लानबाबत कधी चर्चा केली होतीस का असं विचारलं असता जान्हवीनं या प्रश्नाचं उत्तर खुपच मजेशीर पद्धतीनं दिलं.

प्रियांका चोप्राच्या नवऱ्यासोबत फोटो काढायला धावली पाकिस्तानी अभिनेत्री, पण...

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

जान्हवी म्हणाली, आईला मुलांविषयी असलेली माझी मतं कधीच पटत नसत. मी तिच्याशी लग्नाच्या प्लान बद्दल अनेकदा चर्चा केली होती. पण तिन ठरवलं होतं की माझ्यासाठी ती स्वतः मुलगा शोधणार आहे. तिचं म्हणणं होतं की, मी कोणावरही अगदी सहज विश्वास ठेवते. जान्हवीला तिच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, ‘तो टॅलेंटेड असायला हवा, तो आयुष्यात जे काही करेल त्यासाठी तो पॅशनेट असावा. माझा जोडीदार असा असावा की, मला त्याच्याकडून काही शिकता येईल. तसेच त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला असावा. याशिवाय तो माझ्यासाठी वेडा असावा.’

आता रानू मंडलसोबत तिच्या मुलीनेही गायलं गाणं, VIDEO VIRAL

जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. तिनं 2018 मध्ये ‘धडक’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. सध्या ती तिचा आगामी सिनेमा ‘रुही अफजा’ आणि ‘कारगील गर्ल’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. हे दोन्ही सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय ती करण जोहरच्या दोस्ताना 2 मध्येही दिसणार आहे.

ऐश्वर्याच्या वादग्रस्त Memeनंतर पहिल्यांदाच भेटले विवेक-अभिषेक, पाहा काय घडलं

===========================================================

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 09:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading