मुंबई, 10 सप्टेंबर : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे ती तिचा आगामी सिनेमा ‘द स्काय इज पिंक’मुळे. या सिनेमातून प्रियांका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमाची सुरुवातीपासूनच चर्चा झाली. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमा साठी प्रियांकानं सलमान खानचा ‘भारत’ सिनेमा नाकारल्याचं सर्वांनाच माहीत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालं. त्यानंतर आता नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘द स्काय इज पिंक’ सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला. सुरुवातीला प्रियांकाने ‘भारत’ नाकारत हा सिनेमा साइन केला. त्यानंतर सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलीवूडला तडकाफडकी अलविदा केल्यानं या सिनेमाची बरीच चर्चा झाली. या सिनेमात प्रियांका चोप्रा एका टीनेजर मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. ही भूमिका नक्कीच तिच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार आहे. तर अभिनेता फरहान अख्तर वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. आली लग्न घटी! श्रीदेवींची नवराई ‘या’ मंदिरात करणार लग्न
ही कथा जेवढी आयशाची आहे. तेवढीच ती प्रेमात आकंठ बुडालेल्या नवरा-बायकोची आणि त्यांच्या नात्यातील संघार्षाची सुद्धा आहे. मुलगी आयशाच्या जन्मानंतर काही वर्षांत तिच्या गंभीर आजाराविषयी त्यांना समजतं. ज्यानंतर सुरु होते या दोघांच्या रोमँंटिक लव्ह स्टेरीमध्ये ट्रजेडी. आपल्या मुलीला तिच्या आजाराविषयी सांगणं. त्यानंतर तिच्या उपचारांसाठी केलेला संघर्ष. दरम्यान नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा आणि वाद या सगळ्याचं मिश्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. आपल्या मुलीशिवाय दुसरं कोणतंच विश्व नसलेली पण तेवढीच खंबीर आई प्रियांका चोप्रानं साकारली आहे. सत्य स्विकारत हार न मानता संघर्ष करणं म्हणजे द स्काय इज पिंकचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं. …म्हणून विराट- अनुष्काला म्हटलं जातं स्टायलिश कपल
‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून जवळपास 3 वर्षांनी प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाच्या रॅपअप पार्टीमध्ये बोलताना प्रियांका म्हणाली होती, ‘मला अनेकांनी मी ‘भारत’ सोडून ‘द स्काय इज पिंक’ का निवडला असा प्रश्न विचारला. पण मला ‘भारत’ सारख्या ‘डान्स-साँग सिनेमा’ पेक्षा ‘द स्काय इज पिंक’ची कथा जास्त आवडली. मी या सिनेमात 18 वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. पण हा सिनेमा मी फक्त दिग्दर्शक सोनाली बोससाठी केला. कारण या सिनेमाची कथा खूप वेगळी आहे आणि मला ती खूप आवडली त्यामुळे मी हा सिनेमा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी निवडला.’ ‘फेमिनिझम म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणं नक्कीच नाही…’ सोनमची बेधडक मतं प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरीच्या पालकांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा यांच्यासह, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मीती रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. ============================================================ VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा, इतर टॉप 18 बातम्या