जॅकलिनने पहिल्यांदा काढला पोटावर 'खास' Tattoo, पाहा व्हायरल व्हिडिओ!

जॅकलिनने पहिल्यांदा काढला पोटावर 'खास' Tattoo, पाहा व्हायरल व्हिडिओ!

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (jacqueline fernandez instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पहिल्यांदा टॅटू काढताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूड (Bollywood) ची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) नेहमी तिच्या हटके वागण्यामुळे चर्चेत असते. आताही ती अशाच एका झक्कास कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (jacqueline fernandez instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पहिल्यांदा टॅटू काढताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिन तिच्या मित्रांसोबत टॅटू काढत आहे. टॅटू काढताना जॅकलिन अगदी उत्साही दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना जॅकलिनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पहिल्यांदा टॅटू' जॅकलिनने पोटावर पहिला टॅटू काढला असून व्हिडिओमध्ये ती तिच्या चाहत्यांना टॅटू दाखवताना दिसत आहे. जॅकलिनच्या व्हिडिओवर सोशल यूजर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी जॅकलिनच्या टॅटूची स्तुती करत अगदी हॉट कमेंट्स केल्या आहेत.

जॅकलीनने बॉलिवूडमध्ये 'अलादीन' या सिनेमाद्वारे पदार्पण केलं होतं. सलमान खानसोबत 'किक' सिनेमातून तिची सगळ्यांना ओळख झाली. आता जॅकलिन फर्नांडिस, सुशांतसिंग राजपूत सोबत 'ड्राइव्ह' सिनेमात झळकणार आहेत. सध्या ती या सिनेमाच्या कामात व्यस्त असते.

First Published: Oct 7, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading