जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बींचा सिनेमा पाहण्यासाठी महिनाभर जमा करायचा 1 रुपया; KBC 14च्या मंचावर सांगितला मजेदार किस्सा

बिग बींचा सिनेमा पाहण्यासाठी महिनाभर जमा करायचा 1 रुपया; KBC 14च्या मंचावर सांगितला मजेदार किस्सा

बिग बींचा सिनेमा पाहण्यासाठी महिनाभर जमा करायचा 1 रुपया; KBC 14च्या मंचावर सांगितला मजेदार किस्सा

केबीसी 14 च्या मंचावर सगभागी झालेल्या एका स्पर्धकानं अमिताभ बच्चन यांच्यावरचं प्रेम व्यक्त करत एक सुंदर आठवण सांगितली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  27 ऑगस्ट: टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान कार्यक्रमाचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांनी सध्या कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे. प्रकृती सुधारल्यानंतर ते पुन्हा केबीसीचं शुटींग सुरू करणार आहेत.  दरम्यान शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकानं फार सुंदर आठवणी सांगितल्या. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं वेगवान उत्तर देत स्पर्धक गुरूदेव भारत हॉटसीटवर बसले. गुरूदेव आपल्या पत्नीबरोबर कार्यक्रमात सहभागी झाले होते.  त्यांनी 12 लाख 50 हजारांवर गेम क्विट केला.  6 लाख 40 हजारांची रक्कम ते घरी घेऊन गेले. दरम्यान त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं. गेममध्ये अमिताभ बच्चन यांनी गुरूदेव भारत यांना 1 लाख 60 हजारांसाठी प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या उत्तरानंतर गुरूदेव यांनी बिग बींशी संबंधीत एक किस्सा सांगितला.  बिग बींनी त्यांना प्रश्न विचारला, 1957मध्ये भारताने दशांश प्रणाली स्वीकारण्यापूर्वी एक रुपया किती होता? ऑप्शन A-10, B-12, C-14, D-16. याच योग्य उत्तर आहे D-16. हेही वाचा - KBC 14: हॉट सीटवर बसण्यापूर्वी स्पर्धकानं काढला शर्ट, अमिताभ बच्चनलाही बसला धक्का गुरुदेव यांनी या प्रश्नानंतर बिग बींना एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘सर मी तुमचे सिनेमे पाहण्यासाठी संपूर्ण महिन्यात पैसे जमा करायचो. त्यानंतर एक दिवस तुमचा सिनेमा पाहण्यासाठी जायचो. त्यावर अमिताभ यांनी गुरूदेव यांना ’ सिनेमा पाहण्यासाठी किती रुपये जमा करायचा?’, असं विचारलं. त्यावर गुरूदेव म्हणाले, ‘मी तुमचा सिनेमा पाहण्यासाठी एक रुपया जमा करायचो आणि खाऊ खाण्यासाठी 25 पैसे रुपये जमा करायचो. एक रुपयांमध्ये मी तुमचे ‘जंजीर’, ‘मुकद्दर का सिंकदर’ , ‘दिवार’, सारखे अनेक सिनेमे पाहिले आहेत.  गुरूदेव यांचा हा किस्सा ऐकून अमिताभ बच्चन चांगलेच भारावून गेले. शुक्रवारच्या भागात गुरूदेव भारत यांच्यानंतर आग्राचे कावेश कुमार यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. कावेश यांनी 1 लाख 60 हजार रूपये जिंकले.  त्यानंतर 3 लाखांचा प्रश्न चुकल्यानं त्यांना 10 हजार रुपयांची रक्कम घेऊन घरी जावं लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात