बिग बी अमिताभ बच्चन रुग्णालयात, 3 दिवसांपासून सुरू आहेत उपचार

मंगळवारी रात्री 2 वाजता प्रकृती खराब झाल्यानं अमिताभ बच्चन यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 09:05 AM IST

बिग बी अमिताभ बच्चन रुग्णालयात, 3 दिवसांपासून सुरू आहेत उपचार

मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या पोलिसांच्या मते त्यांना रुटीन चेकअपसाठी इथे आणण्यात आलंं आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार त्यांना लीवरची समस्या आहे आणि याविषयी स्वतः अमिताभ बच्चन यांनीच केबीसीमध्ये सांगितलं होतं.

स्पॉटबॉय-ईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री 2 वाजता प्रकृती खराब झाल्यानं अमिताभ बच्चन यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार अमिताभ यांचा लीवर फक्त 25% काम करत आहे आणि त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अमिताभ यांची भेट घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार प्रिसद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ बारवे त्यांच्यावर उपचार करत आहेत.

VIDEO : 'अक्षय कुमार खोटारडा आहे...', Housefull 4 च्या कलाकारांची सटकली!

गुरुवारी देशभरात करवाचौथ साजरा झाला. या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला ज्यात ते पत्नी जया बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांनी लिहिलं, 'खूबसूरती का मुकाबला आज अपने पूरे शबाब पर था,

आज एक चांद दूसरे चांद के इन्तजार में था.~ Ef PA करवाचौथच्या सर्वांना शुभेच्छा ज्या आपल्या पतीच्या जीवनासाठी व्रत करतात. '

Loading...

...म्हणून लिव्ह इनमध्ये राहिलो नाही, रणवीरसोबतच्या नात्यावर दीपिकाचा नवा खुलासा

11 ऑक्टोबरला अमिताभ यांनी 77 वा वाढदिवस साजरा केला. मागच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. इलाहाबादमध्ये 11 ऑक्टोबर 1945मध्ये जन्मलेल्या अमिताभ यांनी 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या सिनेमातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. मात्र 1973 मध्ये आलेल्या जंजीर सिनेमात त्यांनी साकारलेल्या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेनं त्यांना अँग्री यंग मॅन ही ओळख दिली. त्यानंतर आलेल्या दिवार आणि शोले सारख्या सिनेमांनंतर अमिताभ एक महान अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

सलमान-ऐश्वर्याचा हा किस्सा तुम्ही वाचलाच नसेल, बॉलिवूड अभिनेत्रीनं उलगडलं गुपित!

========================================================

EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...