जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 11 : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; सोशल मीडियावर अमिताभ ट्रोल

KBC 11 : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; सोशल मीडियावर अमिताभ ट्रोल

KBC 11 : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; सोशल मीडियावर अमिताभ ट्रोल

KBC 11 च्या एका एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केला, म्हणून अमिताभ यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे नाराजी पसरली आहे आणि बिग बींनी यासाठी माफी मागावी अशी मागणी होत आहे. कौन बनेका करोडपती हा शो ताज्या सीझनमध्ये लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गुजरातच्या स्पर्धक शाहेदा चंद्रन अमिताभ यांच्यासमोर होत्या.‘कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न शाहेदा यांना विचारण्यात आला. यासाठी चार पर्याय देण्यात आले. १. महाराणा प्रताप २. राणा सांगा ३. महाराजा रणजीत सिंह ४. शिवाजी

जाहिरात

छत्रपतींचा उल्लेख फक्त शिवाजी असा करण्यात आल्याने महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर त्याचे पडसाद दिसत आहेत.

औरंगजेबाचा उल्लेख सम्राट असा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मात्र एकेरी उल्लेख झाल्याने नाराजी जास्त आहे. त्यामुळे KBC मध्ये नवा वाद ओढवण्याची शक्यता आहे. ——————————- अन्य बातम्या VIDEO : ऐश्वर्या राय झाली सिंगर, आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! ‘ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?’ पाहा Vicky Velingkar Teaser चाहतीवर भडकणाऱ्या रानू मंडलवर नेटकरी सैराट, Viral Memes एकदा पाहाच

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात