मुंबई, 14 सप्टेंबर : सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता आयुष्यमान आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. वेगळ्या धाटणीचे सिनेमा करणारा अभिनेता अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आयुष्यमानचा रेडिओ जॉकी ते अभिनेता हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. रिअलिटी शो पासून सुरवात करून आज यशाच्या शिखरावर बोलणाऱ्या या अभिनेत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. एवढ्या कमी वयात या अभिनेत्यानं आज बरंच यश मिळवलं आहे. अभिनया व्यतिरिक्त सूत्रसंचालक, लेखक, गायक अशा विविध ठिकणी तो नेहमीच सक्रिय असतो. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्यानं आपला ठसा उमटवला. अशा या अभिनेत्याचा कायमच सर्वांना हेवा वाटतो. फक्त चित्रपटांच्या माध्यमातून नव्हे, इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्याचं ठाम मत सर्वांसमक्ष ठेवण्याचा प्रयत्न आयुष्यान नेहमीच करत आला आहे. यामध्ये लैंगिक शिक्षणाचा मुद्दाही प्रकर्षानं समोर येतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते थेट लैंगिक शिक्षणाविषयी पालकांशी झालेल्या संवादापर्यंत चर्चा केली. Ayushmann Khurrana : बर्थडे बॉयची Dream Girl ची ‘पूजा’ आहे तरी कशी?
चित्रपटांच्या माध्यमातून, तू कायम लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या आयुष्यमानला तू तुझ्या पालकांशी कधी अशा मुद्द्यावर बोलला आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देताना आयुष्यामान सांगतो, ‘त्यावेळी वडिलांशी एकदा माझं या विषयावर बोलणं झालं होतं. मी हस्तमैथुन करत असल्याचं वडिलांना कळालं होतं. तेव्हा हे सर्व काही सामान्य असल्याचं ते म्हणाले होते. या वयात असं होतं. अशी माझ्या वडीलांची प्रतिक्रिया होती.’ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधल्या लवंगीबाईचं ‘हे’ गुपित तुम्हाला माहीत आहे का?
लैंगिक शिक्षणाबाबत आपला अनुभव शेअर करणाऱ्या आयुषमाननं यावेळी एका महत्त्वाच्या मुद्द्य़ावरही प्रकाश टाकला. आयुष्यामन म्हणाला, ‘चित्रपटांच्या माध्यमातून आपण कितीही म्हटलं की लैंगिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे, पण ही बाबही तितकीच खरी आहे, की आई- वडिलांशी या मुद्द्य़ावर बोलायला सर्वांनाच संकोच वाटतो. निदान आपल्या देशात तरी अशीच परिस्थिती आहे.’ रात्रीस खेळ चाले : शेवंतानं घराला लावलं कुलूप, कारण… ============================================================== VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, ‘आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं’