मुंबई, 13 नोव्हेंबर : सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा अमिताभ बच्चन यांचा क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 14' दिवसेंदिवस मजेशीर होत आहे. शोमध्ये, जिथे बिग बी आपल्या उत्कृष्ट होस्टिंग शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तर काहीवेळा ते आपल्या शब्दांनी शोच्या स्पर्धकांना भावूक देखील करतात. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे.
या शोमध्ये आतापर्यंत सर्व प्रकारचे स्पर्धक सहभागी झाले आहेत. काहींनीप्रेक्षकांना खळखळून हसवलं तर काहींच्या कहाणीने बिग बींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणलं. अमिताभही या सर्व स्पर्धकांमध्ये अशा प्रकारे मिसळतात की त्यांच्यासमोर बसलेले स्पर्धकही त्यांचे सर्व दु:ख विसरून कोणत्याही दबावाशिवाय हा खेळ खेळतात. केबीसीच्या मंचावर आता असा स्पर्धक येणार आहे ज्याच्या आयुष्याची गोष्ट ऐकून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. या स्पर्धकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हेही वाचा - मुंबईतील हॅटमॅन किलरचा Video अन् अभिनेता तुषार कपूरचं कनेक्शन काय? ट्विट Viral
या शोच्या आगामी भागात पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. 'KBC 14' च्या आगामी भागाचा प्रोमो सोनी चॅनलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रोमोचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. त्याचं खास कारण म्हणजे यावेळी शोमध्ये एक स्पर्धक दिसणार आहे, जो एका मजुराचा मुलगा आहे जो एक खास ध्येय घेऊन केबीसीच्या मंचावर पोहचला आहे.
View this post on Instagram
केबीसीचा हा प्रोमो खूप भावूक करणारा आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात राजस्थानच्या भिलवाडा शहरातील स्पर्धक मोहसिन खान मन्सूरी सामील झाले आहेत. तो म्हणतोय, 'मी आतापर्यंत एमए केलं, अनेक मुलाखती दिल्या, पण लोकांनी मला सांगितलं की तू एका मजुराचा मुलगा आहेस. आणि मजुराचा मुलगा मजुरीच करेल. मला समाजात मान सन्मान मिळवायचा आहे.' यावर अमिताभ बच्चन त्याला 'मजुराचा मुलगा मालक बनू शकतो.' म्हणत धीर देतात.
मोहसीन करोडपती बनणार कि नाही माहित नाही. पण केबीसीच्या मंचावर येऊन अमिताभ बच्चन सोबत खेळ खेळल्यामुळे तो इतका लोकप्रिय होईल की त्याला कोणी मजुराचा मुलगा म्हणणार नाही. केबीसीच्या मंचावर असे स्पर्धक सामील होतात, ज्यांची कहाणी ऐकून प्रेक्षकांना प्रेरणा मिळते. मोहसीन त्यांच्यापैकीच एक आहेत. आता ते या शो मध्ये किती प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात ते बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, KBC, Tv shows