मुंबई, 1 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. पण सध्या कार्यक्रमाचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केबीसीच्या मंचावर एका धक्कादायक प्रकार घडला आहे. KBC 14 च्या प्रत्येक एपिसोडमध्ये दिसणारे स्पर्धक खूप मजेशीर आणि उत्साही आहेत. त्यामुळेच या मंचावर अनेक मजेशीर प्रकार घडताना दिसून येतात. या शो मध्ये सहभागी अनेक स्पर्धक हा गेम अतिशय मनोरंजक पद्धतीने खेळतात पण त्यासोबतच लखपती बनून बाहेर पडतात. या शो मध्ये अनेक गमतीदार किस्से घडतात. अमिताभ सुद्धा या शोचा मनसोक्त आनंद घेताना दिसतात. नुकताच शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मजेत अमिताभ याना दुखापत होता होता टळली आहे.
केबीसी मध्ये नुकताच कोमल गुप्ता नावाच्या वेटलिफ्टर स्पर्धकाने प्रवेश केला होता. कोमलच्या घरच्यांनी सांगितलेले किस्से ऐकून अमिताभ बच्चन यांना धक्काच बसला. स्पर्धक कोमल गुप्ताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जेव्हापासून ती जिममध्ये जाऊ लागली तेव्हापासून ती खूप कठोर झाली आहे. ती कधी बॉटल फाडते तर कधी दरवाजाचे हँडल उखडते. हे ऐकून अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला. हे ऐकून अमिताभ कोमलला म्हणतात माझा हात दाबून दाखव तेव्हा कळेल तुझ्यात किती जोर आहे ते. यानंतर कोमलने अमिताभ यांचा हात दाबते आणि हाडं तडकल्याचा आवाज येतो. यानंतर अमिताभ बच्चनची मात्र आरडाओरड झाली. त्यामुळे केलेली गंमत त्यांना महाग पडली असती. हेही वाचा - Bhagya dile tu mala : मोहितेंच्या बाप्पाला कावेरीच्या हातचे मोदक; मालिकेत गणरायाच्या नैवेद्याची जय्यत तयारी दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना तिसऱ्यांदा कोविड झाला होता. त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. त्यामुळे केबीसी १४च्या आगामी भागांचे शुटिंग कसे होईल याची चिंता प्रेक्षकांना सतावत होती. मात्र ताज्या माहितीनुसार, ते नुकतेच कोरोनावर मात करून पुन्हा कामावर परतले आहेत. त्यांनी केबीसी च्या शूटिंगला सुरुवात केली आहे अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय अभिनेत्याचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.