अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या स्पेन ट्रिपवर आहे. ती आपल्या विदेशी मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.
प्रियांका ने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांकाचा बिकिनी लूक दिसून येत आहे.
बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली आहे.
प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.
प्रियांकाने बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे.
सध्या प्रियांका पती निक जोनससोबत परदेशातचं वास्तव्यास असते. मात्र ती लवकरच आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत एका रोड ट्रिपवर आधारित चित्रपटात दिसणार आहे.