मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Man Jhala Bajind : 'सरू' आजीनंतर 'फुई' आजीची चर्चा; रणवीर सिंगसोबत देखील केलं आहे काम

Man Jhala Bajind : 'सरू' आजीनंतर 'फुई' आजीची चर्चा; रणवीर सिंगसोबत देखील केलं आहे काम

सगळीकडे चर्चा हाय ती फकस्त आपल्या सर्वांच्या लाडक्या फुई आजीची. सध्या मन झालं बाजींद मालिकेतील फुई आजी हे पात्र खूपच धमाल उडवून देताना दिसत आहे.

सगळीकडे चर्चा हाय ती फकस्त आपल्या सर्वांच्या लाडक्या फुई आजीची. सध्या मन झालं बाजींद मालिकेतील फुई आजी हे पात्र खूपच धमाल उडवून देताना दिसत आहे.

सगळीकडे चर्चा हाय ती फकस्त आपल्या सर्वांच्या लाडक्या फुई आजीची. सध्या मन झालं बाजींद मालिकेतील फुई आजी हे पात्र खूपच धमाल उडवून देताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 07 ऑक्टोबर : झी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली 'मन झालं बाजींद' (Man Jhala Bajind) ही मालिका गावरान ठसक्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकून घेताना दिसत आहे. या मालिकेत रायाची भूमिका वैभव चव्हाण याने तर कृष्णाची भूमिका श्वेता खरात हिने साकारली आहेत. कल्याणी चौधरी, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख यासारखे परिचित कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मात्र या सगळ्यांपेक्षा सगळीकडे चर्चा हाय ती फकस्त आपल्या सर्वांच्या लाडक्या फुई आजीची. सध्या या मालिकेतील फुई आजी ( Fui Aaji )हे पात्र खूपच धमाल उडवून देताना दिसत आहे. आपल्या फूई आजीने  ( Kalpana Sarang) मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयचा ठसा उमठवला आहे. मुलींचा लाडका बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत देखील फूई आजीने काम केले आहे. म्हणूनच आपण या फुई आजीविषयी जाणून घेणार आहे... रणवीर सिंग सोबत केलं आहे काम मन झालं बाजींद या मालिकेत फुई आजीचे दिलखुलास पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव कल्पना सारंग आहे. कल्पना सारंग यांनी मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपटांध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी भाषिक नाटकांतून काम केले आहे. काही रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. रायजिंग स्टार या रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. वाचा : Navratri Spl : नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हळदीच्या रंगात नटल्या मराठी तारका, पाहा Photos 15 ते 16 व्यावसायिक जाहिरातीत केले आहे काम कल्पना सारंग यांनी 15 ते 16 व्यावसायिक जाहिरातीतूनही प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. शॉर्टफिल्म, आगरी सिंघम आणि डॅम्बिस म्हातारी, झी मराठीवरील भागो मोहन प्यारे, द परफेक्शनिस्ट, इन्स्पेक्टर चिंगम अशा विविध माध्यमातून आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील दर्शवला आहे सहभाग कल्पना सारंग यांनी टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला होता. आता त्या मन झालं बाजींद  या मराठी मालिकेत त्या फुई आजीची भूमिका साकारत आहेत. कुटुंबात ज्येष्ठ सदस्य असलेली फुई आजी आपला दरारा राखून ठेवताना दिसत असली तरी राया आणि कृष्णा यांचे लग्न होण्यासाठी त्या काय प्रयत्न करते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा:स्पेन व्हेकेशनदरम्यान प्रियांका चोप्राचा सुपरहॉट LOOK; तुम्ही पाहिलात का हे फोटो? तेजपाल वाघ आणि श्वेता शिंदे यांच्या बहुतेक सर्वच मालिकांमधील आज्यांनी जिंकले आहे प्रेक्षकांचे मन तेजपाल वाघ आणि श्वेता शिंदे यांच्या बहुतेक सर्वच मालिकांमधील आज्यांनी आजवर प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग लागीर झालं जी मालिकेतील ‘जिजीअक्का’ असो किंवा देवमाणूस मालिकेतील ‘सरू आजी ‘ या भूमिका मुख्य कलाकारांइतक्याच यशस्वी ठरल्या व त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. आत यांच्यानंतर सोशल मीडियावर फक्त फुई आजीची चर्चा सुरू आहे. कमी काळात फुई आजीने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee Marathi

पुढील बातम्या