• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिना म्हणते, मागच्या 16 वर्षांपासून आम्ही...

सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिना म्हणते, मागच्या 16 वर्षांपासून आम्ही...

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. तेवढंच प्रेक्षक त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा पसंत करतात.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. तेवढंच प्रेक्षक त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा पसंत करतात. सोशल मीडियावर तर त्यांच्या नात्याविषयी अनेकदा बोललं जातं. मात्र हे दोघंही या सर्व फक्त अफवा असल्याचं सांगतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हेही तिनं स्पष्ट केलं. रणबीर कपूरसोबत सूत जुळल्यानंतर कतरिना सलमान पासून दूर झाली होती मात्र जवळापास 5 वर्षांनी या दोघांनी जेव्हा 'टायगर जिंदा है'मध्ये काम केलं त्यावेळी अनेकांना त्यांच्यातील नातं अद्याप कायम आहे असं वाटलं. मात्र कतरिना आणि सलमान कोणीच या नात्याविषयी कधीच उघडपणे बोलले नाहीत. पण नुकत्याच एका मुलाखतीत कतरिना सलमानसोबतच्या नात्याबाबत उघडपणे बोलली आहे. ती आणि सलमानमध्ये मैत्री व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं असं तिनं यावेळी सांगितलं. एका जाहिरातीसाठी घेतो 11 कोटी, पाहा कोण आहे 'हा' अभिनेता
   
  View this post on Instagram
   

  सीढ़ी , साड़ी , लड़की #Bharat #Promotions @katrinakaif

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  कतरिना सांगते, माझ्यात आणि सलमानमध्ये मागच्या 16 वर्षांपासून मैत्रीपेक्षा काहीच नाही. आम्ही दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत अणि सलमान एक चांगली व्यक्ती आहे. मला जेव्हाही त्याची गरज असते त्यावेळी तो नेहमीच मला पाठिंबा देतो. सलमान अशी व्यक्ती आहे जी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सतत नसेलही मात्र जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते त्यावेळी तो तुम्हाला नक्कीच मदत करतो. रानू मंडलनं सलमान खानच्या गाजलेल्या सिनेमातलं गायलं गाणं, नवा VIDEO VIRAL नुकत्याच पार पडलेल्या IFFA अवॉर्ड सोहळ्यात कतरिनानं डान्स परफॉर्म केलं. त्यावेळी सलमान तिला चिअरअप करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. अवॉर्ड फंक्शनमध्ये ज्यावेळी कतरिनाच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी सलमान उठून उभा राहिला आणि कतरिना-कतरिना ओरडला, शिट्ट्या वाजवू लागला. असं करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
   
  View this post on Instagram
   

  #SalmanKhan big cheer for #katrinakaif at #iifa2019 🔥

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

  कतरिना सध्या तिचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर सलमानचा बहुचर्चित सिनेमा 'दबंग 3' येत्या 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. यात सलमान सोबत सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. Dabangg 3 : सलमान खानसोबत सई मांजरेकरचा फर्स्ट लुक आला समोर, Photo Viral ================================================================= VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी
  Published by:Megha Jethe
  First published: