मुंबई, 5 जून- Katrina Kaif positive for COVID-19: अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर यांच्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफला ( Katrina Kaif ) दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिची कोव्हिड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळेच कतरिना आयफा सोहळ्यास उपस्थित राहू शकली नाही. तसेच तिनं तिचं शूट देखील पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना ‘क्रिसमस’ या चित्रपटाचं शूटींग सुरू करणार होती. मात्र यादरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. याचमुळे ती आयफा अवार्ड सोहळ्यातही सामील झाली नाही. विकी कौशल एकटाच या सोहळ्यात सहभागी झाला. आता कॅटरिना कैफची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला शूट पुन्हा रीशेड्यूल करावे लागले आहे.
#KatrinaKaif has tested covid-positive for the second time. Her shoot for #MerryChristmas with #VijaySethupathi, helmed by #SriramRaghavan had to be rescheduled post her test results. pic.twitter.com/T3lmp1SacU
— Filmfare (@filmfare) June 5, 2022
मुंबईत कोरोना रूग्णांचा वाढती संख्या पाहता, बीएमसीने के-वेस्ट वॉर्डमधील फिल्म स्टुडिओला फिल्मी पार्ट्या आयोजित करू नयेत, अशा सूचना देत नवीन अलर्ट जारी केला आहे. कतरिना कैफच्या कामाबद्दल सांगायचे तर कतरिना टायगर 3 सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती ‘फोन भूत’ या सिनेमात देखील दिसणार आहे. वाचा- हा वेडेपणा जपून ठेव…! कुक्कीनं अप्पूसाठी लिहिली खास पोस्ट मागच्या काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या कलकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. तसेत सध्या सगळीकडे अशी देखील चर्चा आहे की, करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीतून काही बॉलिवूड सेलेब्सना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या काही सेलेब्सना कोरोनाची लागण झाल्याती माहिती समोर आलेली आहे.