जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Thipkyanchi Rangoli: हा वेडेपणा जपून ठेव...! कुक्कीनं अप्पूसाठी लिहिली खास पोस्ट; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Thipkyanchi Rangoli: हा वेडेपणा जपून ठेव...! कुक्कीनं अप्पूसाठी लिहिली खास पोस्ट; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव


Thipkyanchi Rangoli: हा वेडेपणा जपून ठेव...!  कुक्कीनं अप्पूसाठी लिहिली खास पोस्ट; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Thipkyanchi Rangoli: हा वेडेपणा जपून ठेव...! कुक्कीनं अप्पूसाठी लिहिली खास पोस्ट; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेतील कुक्की आणि अप्पूची गँग जितकी स्किनवर एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे तितकीच ती ऑफस्क्रिनही जोडली गेली. अभिनेता अतुल तोडकरनं ( Atul Todankar) नुकतीच अभिनेत्री ज्ञानदासाठी (Dyanada Ramtirthkar ) खास पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जून: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. ‘अप्पू’ (appu) आणि ‘शशांक’ची (Shashank) आगळी वेगळी जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. तर ‘कुक्की गँग’ची (Kukki Gang) धम्माल प्रेक्षकांच्या मनात राज्य करतेय. अप्पू मालिकेत फार बावळट किंवा निरागस वाटली असली तरी अभिनेत्री ‘ज्ञानदा रामतीर्थकर’ (Dyanada Ramtirthkar )  हिने अप्पू फार उत्तमरित्या साकारली आहे. एक निरागस, क्यूट अप्पू साकारण ज्ञानदासाठी खरंच मोठा टास्क आहे. मालिकेत सध्या कुक्की आणि अप्पूची गँग त्यांच्या नव्या प्लानसह तयार झाली आहे. ठिपक्यांची रांगोळी ही मल्टिस्टारर मालिका आणि मालिकेतील कलाकारांमध्ये असलेलं बॉडिंग आपल्याला प्रत्येक एपिसोडमध्ये दिसून येतं.  कुक्की म्हणजे अभिनेता ‘अतुल तोडणकर’नं (Atul Todankar) अप्पूसाठी म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. कुक्की आणि अप्पूची गँग जितकी स्किनवर एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे तितकीच ती ऑफस्क्रिनही जोडली गेली. अतुल तोडणकरनं ज्ञानदाबरोबरचा सेटवरचा फोटो शेअर करत म्हटलंय, ‘माझी अत्यंत गोड मैत्रीण, समंजस अभिनेत्री, सर्वांची लाडकी आणि वेडेपणात अव्वल अशी अप्पू अर्थात ज्ञानदा रामतीर्थकर… हा वेडेपणा जपून ठेव बाळा’. अतुलनं ज्ञानदासाठी ही सुंदर पोस्ट शेअर प्रेम व्यक्त केलं आहे.

जाहिरात

अतुलनं शेअर केलेल्या पोस्टमधून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर किती गोड आणि उत्तम अभिनेत्री आहे आणि त्याहून महत्त्वाचं ती किती उत्तम माणूस आहे हे लक्षात येतेय. हेही वाचा -  सोनाली पाटीलच्या हाताला हे काय झालं.? विकास पाटील म्हणतो, लवकर बरं व्हा आणि मैदानात.. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. सध्या मालिकेत कुक्की आणि त्याची एकत्र आली असून नवीन प्लान आखत आहेत. अप्पू आणि शशांकला एकत्र आणण्यासाठी कुक्कीची गँग पुन्हा सज्ज झाली आहे. अतुलच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी ज्ञानदाचं कौतुक केलंय. एका युझरने म्हटलंय,  ‘ज्ञानदा ताई खुप चांगली व्यक्ती आहे आणि उत्तम काम करते ती चांगली अभिनेत्री आहे ज्ञानदा ताई मध्ये जादू आहे वेडेपणा आहे’, तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘आमची अप्पू आणि ज्ञानदा दोघीही फार क्यूट आहेत’. अभिनेत्री ज्ञानदा हिनं ‘सख्या रे’ या मलिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. त्यानंतर 2020मध्ये ती ‘धुरळा’ या मल्टिस्टारर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  त्याचप्रमाणे ‘शतदा प्रेम करावे’, ‘जिंदगी नॉट आऊट’ सारख्या मराठी मालिकेत काम केलं आहे. तर 2021मध्ये ती ‘शादी मुबारक’ या हिंदी मालिकेतही दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात