मुंबई, 07 सप्टेंबर : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलीवूडमधील क्यूट कपल आहे. सगळीकडे यांचीच चर्चा होते. अनेकांना तर कतरिना-विकीचं जुळलं कसं,कधी यावर अगदी आतापर्यंत प्रश्न पडताना दिसत आहेत. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण7’ शो मध्ये विकी-कतरिनानं आपल्या लव्हलाईफ-लग्नाविषयी पहिल्यांदा खुलासा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा होते. या कार्यक्रमाचा प्रत्येक एपिसोड हिट ठरतो. या शो मध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटीज आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी वेगवेगळे खुलासे करतात जे पुढे चर्चेचे विषय ठरतात. आता कतरिनाने देखील यांच्या लग्नाविषयी केलेला खुलासा सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतोय. ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये १० व्या एपिसोडमध्ये सहभागी झाली होती. तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी देखील त्या एपिसोडमध्ये आले होते. या एपिसोडमध्ये कतरिनानं करणसमोर विकी आणि आपल्या नात्याविषयी अनेक गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. ती म्हणाली कि, “मला त्याच्याबद्दल फार काही माहीत नव्हतं. त्याचं नाव मी ऐकलं होतं, पण काम करण्याची संधी कधी मिळाली नव्हती. पण जेव्हा मी त्याला भेटले, तेव्हा त्याने माझं मन जिंकलं”, अशा शब्दांत कतरिना विकीविषयी व्यक्त झाली.
विकी आवडल्याचं सर्वांत आधी तिने दिग्दर्शक झोया अख्तरला सांगितलं होतं. विशेष म्हणजे झोयाच्याच पार्टीमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. विकीसोबतचं नातं अनपेक्षित असल्याचं म्हणत कतरिनाने पुढे सांगितलं, “हे माझ्या नशिबात लिहिल होतं आणि हे घडणारच होतं. आम्हा दोघांमध्ये इतके योगायोग जुळून आले की एके क्षणी मला हे सर्व एखाद्या स्वप्नासारखंच वाटत होतं.” हेही वाचा - KBC 14 : स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’; ऐकून बिग बींनी मारला कपाळावर हात कतरिना आणि विकीने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. यावेळी दोघांचे कुटुंबीय आणि मोजका मित्रपरिवार उपस्थित होता. कतरिना लवकरच ‘फोन भूत’ या हॉरर कॉमेडीमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सलमान खानसोबत तिचा ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.