जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कतरिना-विकीच्या घरी लवकरच पाळणा हलणार..महत्त्वाच्या व्यक्तिने केला बेबी प्लॅनिंगचा खुलासा

कतरिना-विकीच्या घरी लवकरच पाळणा हलणार..महत्त्वाच्या व्यक्तिने केला बेबी प्लॅनिंगचा खुलासा

katrina kaif

katrina kaif

कतरिनाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. कारण कतरिनाला नेहमी तिच्या प्रेग्नंशीविषयी विचारलं जातं. आता या प्रश्नावरचं उत्तर समोर आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मे- बॉलिवूड सेलेब्सविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. त्यांची पर्सनल लाईफ असेल किंवा मग प्रोफेशनल लाईफबद्दल लहान-मोठी गोष्ट जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. आपले आवडे कलाकार काय खातात, कसे राहतात एवढचं नाही तर ते लग्न कधी करणार आहेत. याही पुढे जाऊन ते आई -बाबा कधी होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असते. अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या चाहत्यांना देखील या दोघांनी गुडन्यूज द्यावी अशी इच्छा आहे. या दोघांनी लवकरच आई-बाबा व्हावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. कतरिना प्रेग्नेंट असल्याची चर्चा अनेकदा कानावर येते. कतरिना कधी गुड न्यूज देणार याकडे नेहमीच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. कतरिनाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. कारण कतरिनाला नेहमी तिच्या प्रेग्नंशीविषयी विचारलं जातं. आता या प्रश्नावरचं उत्तर समोर आलं आहे. मागच्या काही दिवसात बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी लग्नगाठ बांधली तर काहींनी आपलं रिलेशन सर्वांसमोर जाहीर केलं आहे. आलिया- रणबीर यांनी लग्न केलं आणि आता ते आई-बाबा देखील झाले आहेत. कतरिना आणि विकी यांना देखील मुलाबद्दल अनेकदा प्रश्न विचारला जातो. या दोघांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती, तेव्हापासून ते आजपर्यंत चाहते गुडन्यूजची वाट पाहत होते. वाचा- गोळ्या घालून झाली हत्या; असा होता ‘कॅसेट किंग’ गुलशन कुमारचा प्रवास अशातच आता अभिनेत्री कतरिना कैफने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिनं नुकतचं तिच्या फॅमेली प्लॅनिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, कतरिनाने तिच्या मैत्रिणींना सांगितले आहे की, “विजय सेतुपती आणि फरहान अख्तरसोबत चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केल्यानंतरच मी बेबी प्लॅनिंग करेन.” म्हणजेच लवकरच विकी आणि कतरिनाच्या घरी पाळणा हलणार आहे, एवढे मात्र नक्की आहे.

News18लोकमत
News18लोकमत

विजय सेतुपतीसोबत कतरिना जो चित्रपट करत आहे त्याचे नाव ‘मेरी ख्रिसमस’ आहे, ज्याचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. तर दुसरीकडे ती फरहान अख्तरसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटात काम करत आहे. ज्यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहेत. याशिवाय ती सलमान खानसोबत टायगर 3 देखील सिनेमात दिसणार आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.टायगर 3’मध्ये इमरान हाश्मीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सने बनवला असून त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट यशराजच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात