मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Katrina Kaif Pregnancy: विकीसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली कतरिना कैफ; प्रेग्नेंसीच्या चर्चांनी धरला जोर

Katrina Kaif Pregnancy: विकीसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली कतरिना कैफ; प्रेग्नेंसीच्या चर्चांनी धरला जोर

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.

  मुंबई, 20 ऑगस्ट-   बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान, कतरिना आता पती आणि अभिनेता विकी कौशलसोबत मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर दिसून आली. या अभिनेत्रीला क्लिनिकच्या बाहेर पहिल्यानंतर आता तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेला आणखीनच वेग आला आहे. कतरिना आणि विकीच्या चाहत्यांचा अंदाज आहे की हे सेलिब्रिटी कपल लवकरच आईबाबा बनणार आहेत. परंतु नेमकं सत्य काय आहे आपण जाणून घेऊया. प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाने गुलाबी रंगाची एकदम ढगळी अशी कुर्ती परिधान केली होती. अलीकडे अभिनेत्री सतत सैल कपडे परिधान करताना दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी पापाराझींनी कतरिनाला मुंबई एयरपोर्टवर आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. यावेळी देखील अभिनेत्री सैल कपड्यांमध्ये दिसली होती. एयपोर्टवर अभिनेत्रीने राखाडी रंगाचा स्वेटशर्ट आणि ऑरेंज कलरचा जॉगर्स परिधान केला होता.सध्या सोशल मीडियावर या नव्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.परंतु विरल भयानीने दिलेल्या रिपोर्टनुसार हे दोघेही डेंटिस्टकडे गेले होते. दरम्यान कतरिना प्रेग्नंट आहे की नाही हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. पण तिची क्लिनिक भेट नक्कीच चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी कतरिना आणि विकी हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. कतरिना आणि विकीचे चाहते सतत आशा व्यक्त करत आहेत की हे गोड जोडपं लवकरच गुड न्यूज देतील. नुकतंच एका मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ 'कॉफी विथ करण'मध्ये आपली प्रेग्नेंसी जाहीर करण्याची शक्यता आहे.
  (हे वाचा:Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकी बनणार आईबाबा? 'कॉफी विथ करण'मध्ये गुड न्यूज देण्याची शक्यता ) कारण करण जोहर आणि हा शो अभिनेत्रीसाठी फारच खास आहे. याच शोमधून विकी आणि कतरिनाची लव्हस्टोरी सुरु झाली होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीय. कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांनाही आपल्या खाजगी गोष्टीवर कॅमेऱ्यासमोर चर्चा करणं पसंत नाहीय. त्यामुळे त्यांनी लग्नसुद्धा अत्यंत खाजगी पद्धतीने केलं होतं. परंतु या शोमध्ये अभिनेत्री गुड न्यूज देऊ शकते. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय.कामाबाबत सांगायचं तर, विकी आणि कतरिना दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्टसमध्ये प्रचंड व्यग्र आहेत. ते लवकरच विविध चित्रपटातून पडद्यावर झळकणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या