मुंबई 25 जुलै: अभिनेत्री कतरीना कैफ सध्या बरीच चर्चेत येताना दिसत आहे. स्वतःचा वाढदिवस साजरा करायला कतरीना मालदीवला सहकुटुंब आणि काही मोजक्या मित्रांसमवेत गेल्याचं दिसून आलं होतं. सध्या (katrina kaif new movie) कतरीना तिच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बरीच व्यस्त असताना दिसत आहे. तिची नवी इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय बनत आहे. कतरिना कैफ आणि साऊथ अभिनेता विजय सेतुपती हे श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमात दिसून येणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रोसेसला बराच वेग आला असून कतरीना बरीच मेहनत घेताना दिसून येत आहे. तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने सिनेमाच्या रिहर्सलचे काही क्षण शेअर केले आहेत. यामध्ये सिनेमाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि विजय सेतुपती सुद्धा दिसून येत आहेत. कतरीना यांच्यासह मिळून चर्चा करताना दिसत आहे. या खास फोटोला कॅप्शन देत ती लिहिते, ‘वर्क इन प्रोग्रेस’. कतरिना येत्या काळात भूत पोलीस या सिनेमात सुद्धा बघायला मिळणार आहे. तिच्यासह या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर असणार आहेत. कतरिना वर्क आणि पर्सनल फ्रंन्टवर बरीच चर्चेत येत आहे. कतरिना नुकतीच वाढदिवसाच्या निमित्ताने सुट्टीवर गेली होती. तिथे धमाल करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओसुद्धा बरेच viral झाले होते. आता हॉलिडे संपवून आपल्या कामाला रुजू झाल्याचं कळत आहे.
कतरीना आणि विकी या कपलला सुद्धा जीवे मारण्याची धमकी येत असल्याच्या बातमीने सध्या खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावरून या दोघांना ही धमकी देण्यात आली होती. हे ही वाचा- एकतर्फी प्रेमात झाला वेडा, कतरिनासोबत करायचे होते लग्न मात्र, पोहोचला थेट तुरुंगात या दोघांनीही आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर एका संशयिताला अटक सुद्धा करण्यात आली आहे.येत्या काळात कतरिना भाईजान सलमानसोबत टायगर 3 मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. एकूणच कतरिनासाठी येणारी वर्ष बरीच धमाकेदार असणार आहेत असं म्हणायला हरकत नाही.