Home /News /entertainment /

सलमान खानचं गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि EX सोबत न्यू ईयर सेलिब्रेशन? VIDEO पाहून सर्वच चकित

सलमान खानचं गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि EX सोबत न्यू ईयर सेलिब्रेशन? VIDEO पाहून सर्वच चकित

जगभरात आज नव्या वर्षाच्या (New Year 2022) स्वागताची धूम आहे. सुपरस्टार सलमानन खान (Salman Khan) नेही नव्या वर्षाचे स्वागत आपल्या हटके अंदाजात केलं आहे.

  मुंबई, 1 जानेवारी-जगभरात आज नव्या वर्षाच्या (New Year 2022) स्वागताची धूम आहे. अगदी सामान्य माणसापासून ते सेलेब्सपर्यंत सर्वचजण नववर्षाचे उत्साहात स्वागत करत आहेत. बॉलिवूडमध्येही उत्साह असून अनेक सेलेब्सनी हटके अंदाजात सेलिब्रेशन केलं आहे. सुपरस्टार सलमानन खान (Salman Khan) नेही नव्या वर्षाचे स्वागत आपल्या हटके अंदाजात केलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये सलमान आपल्या कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर (Iulia Vantur) सोबत दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) ही दिसत आहे. अभिनेत्री बीना काक यांनी सलमानच्या न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी चाहत्यांना नववर्ष 2022 च्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या फोटोंमध्ये बिना काक यांच्यासोबत सलमानही दिसत आहे. यामध्ये सलमानने काळ्या-पांढऱ्या रंगाचं जॅकेट आणि काळा टीशर्ट परिधान केला आहे. तर बीना काक वेलवेट कुर्तीत दिसत आहेत. वाचा-काय म्हणता..दीपिकाच्या बनीसोबत आलिया भट्ट, फोटो जरा पाहाचं! यूलिया वंतूरनेही आपल्या इन्स्टावर नववर्षाचे स्वागत करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान दिसत नाही. परंतु, संगिता बिजलानीच्या उपस्थितीतीने सर्वांनाच धक्का दिला आहे. तसेच या व्हिडिओत बीना काकही दिसत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Iulia Vantur (@vanturiulia)

  या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी संगिता बिजलानीच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी व्हिडिओत सलमानचं न दिसणं तसेच यूलिया वंतूर आणि सलमानच्या नात्यावरही प्रश्न केले आहेत. वाचा-'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाने केलं गुपचूप लग्न, फोटोंनी केलं सरप्राईज दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सलमानने पनवेल येथील आपल्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. याचे व्हिडिओ आणि फोटोही खूप व्हायरल झाले. 27 डिसेंबरला झालेल्या या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा झाली.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan

  पुढील बातम्या