जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘श्वेता तिवारी ही माझी सर्वात मोठी चूक’; सीनेज खानचा गौप्यस्फोट

‘श्वेता तिवारी ही माझी सर्वात मोठी चूक’; सीनेज खानचा गौप्यस्फोट

‘श्वेता तिवारी ही माझी सर्वात मोठी चूक’; सीनेज खानचा गौप्यस्फोट

श्वेता तिवारीमुळं (Shweta Tiwari) त्याचं स्टारडम संपलं. श्वेता ही त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी चूक होती असा दावा त्यानं केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 28 जून**:** कसौटी जिंदगी की (Kasautii Zindagii Kay) या मालिकेतून नावारुपास आलेला सीनेज खान (Cezanne Khan) हा कधीकाळी एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जायचा. त्यानं मालिकेत साकारलेली अनुराग बासू (Anurag Basu) ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती. यामुळं छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून तो चर्चेत होता. परंतु श्वेता तिवारीमुळं (Shweta Tiwari) त्याचं स्टारडम संपलं. श्वेता ही त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी चूक होती असा दावा त्यानं केला आहे. धुम्रपानामुळं विशाल दादलानी गेला होता नैराश्येत; दिवसाला ओढायचा 40 सिगरेट सीनेजनं इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं श्वेता सोबतचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “श्वेता ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. अशी चूक मी पुन्हा करणार नाही. मला तिच्याशी आता काही घेणदेण नाही. ती काय करतेय मला माहित नाही. मालिकेच्या निमित्तानं आमच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. आम्ही खूप खासगी गोष्टी देखील शेअर केल्या होत्या. पण त्या गोष्टी आता व्यर्थ आहेत.” जॅस्मिन भसीननं केला होता आत्महत्येता प्रयत्न; केला धक्कादायक खुलासा श्वेतानं कसौटी जिंदगी की या मालिकेत सीनेजच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. त्यावेळी प्रेरणा आणि अनुरागची जोडी हिट झाली होती. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची देखील चर्चा होती. परिणामी श्वेता आणि राजा चौधरीचा घटस्फोट झाला होता. राजानं देखील घटस्फोटानंतर दोघांच्या अफेअरचा दावा केला होता. परंतु कसौटी जिंदगी की नंतर सीनेत फारसं काम मिळालं नाही. अन् सध्या तर तो बेरोजगार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात