जीन यांनी तसं वेगवेगळ्या क्षेत्रांंमध्ये काम केलं आहे. मात्र त्यांचा ओढा कमर्शिअल आर्टकडेच होता. एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन, लष्करासाठी काम, वैमानिकाचं प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात काम केल्यानंतर आरोग्याच्या अजचणींंमुळे त्यांना ही क्षेत्रं सोडावी लागली. कमर्शिअल आर्टकडे वळल्यानंतर त्यांनी अॅनिमेशनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी ‘Tom And Jerry’चे १३ एपिसोड्स तसंच पोपॉय (Popeye) या प्रसिद्ध कॉर्टून सिरीजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. (हे वाचा-#AskSRK लोकसंख्या वाढविण्यापेक्षा मुलांसोबत खेळतो, चाहत्याच्या प्रश्नांवर शाहरुख) जीन यांंना त्यांच्या चित्रपटांसाठी अनेकदा वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. 1958 साली सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे ऑस्कर्स नामांकन, त्यानंतर १९६० साली मुनरो या अॅनिमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅनिमेशनपट म्हणून नामांकन, तर १९६४ या वर्षी हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अव्हॉइड फ्रेंडशीप या दोन चित्रपटांसाठी यांना सर्वोत्तम अॅनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. संपादन - जान्हवी भाटकरR.I.P Gene Deitch (1924-2020) pic.twitter.com/QOTDmZgAq3
— Down the Inkwell (@DownInkwell) April 17, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.