आलिया भटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'Traditional Look' मधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला स्टनिंग ड्रेस 'पटाका गर्ल'ने घातला आहे. (Image Credit- Instagram @aliaabhatt)
नेहमीच हॉट लूकमध्ये दिसणारी आलिया या लेहंग्यामध्येही Hot दिसत आहे. तिच्या लूकला साजेसा मांगटिका आणि टिकली तिचं सौंदर्य आणखी खुलवत आहे. (Image Credit- Instagram @aliaabhatt)
इन्सावर तिने पोस्ट केलेल्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. मनिष मल्होत्रा, दिया मिर्झा आणि आलियाची प्रतिस्पर्धी असणाऱ्या अनुष्का शर्माला देखील तिच्या सुंदर फोटोवर कमेंट करण्यावाचून राहावलं नाही (Image Credit- Instagram @aliaabhatt)
आलिया भट्टने सिल्वर आणि गुलाबी रंगाचं वर्क केलेला पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. त्यावर गुलाबी रंगाचाच 'Perfect Match' असणारा ब्लाउज घातला आहे. (Image Credit- Instagram @aliaabhatt)
अरमान जैनच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी आलिया आपला बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि सासू नीतू सिंगसोबत दिसली (Image Credit- Instagram @aliaabhatt)
बिग फॅट वेडिंग रिसेप्शनमध्ये आलियाने रणबीर आणि नितू कपूर सोबतच एन्ट्री घेतली. रणबीर आणि नितू कपूरदेखील 'Traditional Look' मध्ये या पार्टीमध्ये सहभागी झाले होते (Image Credit- Instagram @viralbhayani)
बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि होणारी सासू नितू कपूरसोबत आलिया वारंवार दिसू लागल्याने तिचे फॅन्स खूपच आनंदी आहेत. या दोघांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. (Image Credit- Instagram @viralbhayani)