नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी काय विचार करतो अंगद बेदी

नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी काय विचार करतो अंगद बेदी

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंगद त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल पहिल्यांदाच बोलला...

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : अभिनेता अंगद बेदी आज  36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानं 2018मध्ये अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्नगाठ बांधली.  त्यांचं हे लग्न नेहमीच काही ना काही कारणनं चर्चेत राहिलं. मात्र त्यापेक्षा त्याचं नोरा फतेहीसोबतचं अफेअर आणि त्यानंतर ब्रेकअप सुद्धा गाजलं होतं. सर्व काही ठीक असताना या दोघांचं ब्रेकअप का झालं यावर नोरा किंवा अंगदपैकी कोणीच काही बोललं नाही. मात्र काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंगद त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल पहिल्यांदाच बोलला...

एका मुलाखतीत अंगद बेदीनं त्याची पर्सनल लाइफबद्दल चर्चा केली. यावेळी तो एक्स गर्लफ्रेंड नोरा फतेही बाबत तो काय विचार करतो हेही त्यानं स्पष्ट केलं. नोराला डेट करण्याबद्दल अंगद म्हणाला, प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, काही नाती दिर्घकाळ टिकतात, तर काही नाही टिकत प्रत्येकाला त्याचं नातं दिर्घकाळ टिकावं असं वाटत असतं आणि तो त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो. असं करुन ते नातं टिकलं तर ठिक नाहीतर मग त्यानंतर आपल्याला मनस्ताप सहन करण्यापलिकडे काहीच मिळत नाही.

अंगद पुढे म्हणाला, माझ्या नात्याबद्दल बोलायचं तर नोरा खूप चांगली मुलगी आहे. तिच्या लाइफमध्ये खूप चांगलं करत आहे. तिला प्रेक्षक पसंत करत आहेत. ती तिच्या कामात ती स्टार आहे. ती तिच्या करिअरमध्ये पुढे जात आहे. मी तिच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

अंगद म्हणाला, मला वाटतं नोराला तिच्यासाठी योग्य असलेला जोडीदार लवकरच मिळेल. मला वाटतं, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. माझ्या नात्याबद्दल सांगायचं तर हे पूर्ण यूनिव्हर्स माझ्या आयुष्यात बदल घडवून आणू इच्छित होतं आणि तसं झालं सुद्धा . त्यामुळे मला वाटतं नोराच्या जीवनात स्टारडम येणार असेल. सध्या तिच्या स्टारडमची वेळ आहे. त्यानंतर तिचा फॅमिली टाइम सुद्धा येईल.

First published: February 6, 2020, 7:43 AM IST

ताज्या बातम्या