कार्तिक आर्यनला 'तिने' केलं खुल्लमखुल्ला प्रपोज, VIDEO पाहून वाढलं साराचं टेन्शन

कार्तिक आर्यनला 'तिने' केलं खुल्लमखुल्ला प्रपोज, VIDEO पाहून वाढलं साराचं टेन्शन

अलिकडच्या काळात कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या सिनेमांव्यतिरिक्त फॅनफॉलोइंगमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता जिथे कुठे जाईल तिथे त्याचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येत असतात आणि तो सुद्धा कधीच चाहत्यांना नाराज करत नाही. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे कार्तिक सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यनला एक मुलगी सर्वांसमोर प्रपोज करताना दिसत आहे.

कार्तिक आयर्यनला एक मुलगी प्रपोज करत असतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तिथे रेड-यल्लो ड्रेसमध्ये एक मुलगी 2 तास वाट पाहत होती.

VIDEO : केवढं ते प्रेम! आलिया भट्ट किचनमध्ये स्वतः करतेय रणबीरचा आवडता केक

या मुलीला 2 तास वाट पाहताना बघून कार्तक तिला विचारतो, तू खरंच एवढा वेळ वाट पाहत होतीस का? तेव्हा ती मुलगी त्याच्याकडे पाहत त्याला हो बोलते आणि त्यानंतर लगेचच ती सर्वांसमोर गुडघ्यावर खाली बसत कार्तिक आर्यनला प्रपोज करते. चाहत्याच्या या कृतीवर कार्तिक आर्यन अवाक होतो आणि 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहतो. नंतर तो तिचा हात पकडून तिला उभं करतो आणि तिच्यासोबत सेल्फी घेतो.

रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO

कार्तिक आणि त्याच्या चाहतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडीओला युजर्स आणि चाहत्याची पसंती मिळत आहे. अलिकडच्या काळात कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. हे दोघं अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यावर सारा अली खानचं टेन्शन वाढू शकतं असं म्हटलं जात आहे.

कार्तिकच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर त्याचा शेवटचा सिनेमा 'लुका-छुपी' होता. या सिनेमात तो अभिनेत्री कृती सेननसोबत दिसला होता. त्यानंतर नुकतंच त्यानं 'पति पत्नी और मैं' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमात त्याच्यासोबत भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलमध्ये तो सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Laal Kaptan Trailer 2 : दीपक डोबरियालचा अनोखा अवतार, ओळखणंही झालं कठीण

=============================================================

Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

First published: September 29, 2019, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading