VIDEO : केवढं ते प्रेम! आलिया भट्ट किचनमध्ये स्वतः करतेय रणबीरचा आवडता केक

VIDEO : केवढं ते प्रेम! आलिया भट्ट किचनमध्ये स्वतः करतेय रणबीरचा आवडता केक

रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला आवडणारा पायनापल फ्लेवर्ड केक करण्यात आलिया बिझी होती. त्या वेळचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : रणबीर कपूर ranbir kapoor आणि आलिया भट्ट alia bhatt यांची जोडी हे सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेलं स्वीट कपल आहे. गेले काही महिने रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर त्या दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल न लपवता उघडपणे कबूलही केलं.

रणबीरचे आई- वडील म्हणजे नीतू आणि ऋषी कपूर यांनाही भेटायला आलिया गेली, तेव्हाचे फोटो, व्हिडिओ मीडियातून प्रसिद्ध झाले होते. आता शनिवारी रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया स्वतः त्याच्यासाठी स्वतः केलेला केक गिफ्ट देणार आहे. रणबीरचा शनिवारी 28 सप्टेंबरला 37 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रणबीरला आवडणारा पायनापल फ्लेवर्ड केक करण्यात आलिया बिझी होती.

आलियाचा केक बेक करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी यांच्या instagram अकाउंटवर पहिल्यांदा हा व्हिडिओ शेअर झाला आणि रणबीर आलियाच्या चाहत्यांनी तो व्हायरल केला.

 

View this post on Instagram

 

#aliabhatt baking #ranbirkapoor favourite Pineapple flavoured cake 😻😻😻😻

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

'कॉफी विथ करण' या शोमध्ये आलियानं रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंटदेखील दिली होती.

पाहा - रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO

प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे कपल कित्येक कार्यक्रम, शोमध्ये एकत्रित पाहायलादेखील मिळाले. कपूर-भट कुटुंबीयांमध्येही चांगलीच जवळीक निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाचे ब्रायडल लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावरून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण खरंतर एका ब्रँडसाठी आलियानं हे फोटोशूट केलं होतं.काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. पण अधिकृतरित्या या दोघांकडून लग्नाबाबत कोणतंही विधान करण्यात आलेलं नाही.

लतादीदी@90 : या राजकुमारावर लता मंगेशकरांचं होतं प्रेम, पण...

------------------------------

VIDEO साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

First Published: Sep 28, 2019 08:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading