हिमेशनंतर रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO

हिमेशनंतर रानू मंडलनी उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं नवं गाणं, पाहा EXCLUSIVE VIDEO

रानू मंडल यांचा हा व्हिडीओ हिमेश रेशमियानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल आता प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रिलीज झालं असून याशिवाय त्यांनी प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियासोत 3 गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर रानू मंडल यांच्या नावाचीच चलती आहे. स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगर होण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा असाच होता. दरम्याच्या काळात त्याचे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले. पण आता एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात रानू मंडल प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्यासोबत गाताना दिसत आहे.

रानू मंडल यांचा हा व्हिडीओ हिमेश रेशमियानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रानू मंडल आपल्या जादुई आवाजात 'कह राही है नजदीकियाँ' हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रानू यांच्यासोबतच हिमेश रेशमिया, उदित नारायण आणि गायिका पायल देव हे सुद्धा गाणं गाताना दिसत आहेत. हिमेशनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पहिलं प्रेम, पहिली डेट... सुशांत सिंह राजपूतनं उलगडलं 'लव्ह लाइफ सीक्रेट'

Loading...

 

View this post on Instagram

 

My creative instinct said that for this Classic Romantic track Keh Rahi Hai Nazdeekiyaan from my forthcoming film Happy Hardy and Heer, I should collaborate with the most talented, unique and unconventional talents of the industry. Legendary, Divine and Majestic - featuring Udit Narayan, Ranu Mondal, Paayal Dev and Himesh Reshammiya. Expect the unexpected on this most auspicious day for the Indian Music Industry, Our Dearest Lata Ji’s Birthday. Lots of Love and Thanks again for all your support.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे. याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे.

एक वेळ होती की, रानू मंडल राणाघाट स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागत होत्या मात्र एका व्हिडीओनं त्यांचं आयुष्य बदललं. रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं 'प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला.

सोशल मीडियावर सक्रिय असतात लता दीदी, कोण करतं त्यांचे ट्वीट घ्या जाणून

त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

रानू यांचे  व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी एतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं.

आपल्या गाण्याविषयी रानू सांगतात, 'गाण्यासाठी मी कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. रेडिओ किंवा टेपवर लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मी गाणं शिकले आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करु लागले.' तरुण वयात रानू क्लबमध्ये गात असत पण पुढे लग्न झाल्यावर त्यांच्या सासरच्या विरोधामुळे त्यांना गाणं सोडावं लागलं.

राखी सावंतनं पहिल्यांदाच शेअर केला पतीचा फोटो, पण त्यातही आहे अनोखा ट्विस्ट

=============================================================

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...