मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूडचा हॅंडसम हंक अभिनेता कार्तिक आर्यन चा आज वाढदिवस असून तो त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिक सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चाललेली पहायला मिळत आहे. चाहत्यांमध्ये अभिनेत्याची खूप क्रेझ आहे. अशातच कार्तिकच्या वाढदिवशी त्याने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. या गिफ्टमुळे चाहते खूप खूश आहेत. कार्तिक ‘शेहजादा’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आज अखेर त्याने त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. वाढदिवशी चाहत्यांना हे सरप्राईज दिलं आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘शेहजादा’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये कार्तिक एका हटके भूमिकेत पहायला मिळत आहे जो आपल्या कुटुंबासाठी काहीही करु शकतो. टीझर सुरु होताच मोठी आलिशान हवेली दाखवण्यात आली आहे. त्यानंतर कार्तिक घोड्यावर स्वार झालेला पहायला मिळतोय. व्हिडीओमध्ये त्याची जबरदस्त अॅक्शन चाहत्यांची मनं जिंकत आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या ग्लॅमरसच्या तडक्याने सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. एकंदरीत टीझरवरुन चित्रपटात कार्तिकचा कधीही न पाहिलेली अंदाज पहायला मिळतोय.
कार्तिकने टीझन शेअर करत लिहिलं, जेव्हा गोष्ट कुटुंबावर येते तेव्हा चर्चा नाही तर अॅक्शन करतात. वाढदिवसाचं गिफ्ट तुमच्या शेहजादाकडून. कार्तिक आणि क्रिती सेनन दुसऱ्यांचा या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करत आहे. या पहिले दोघे ‘लुका छुप्पी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. शेहजादा हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरुमुलू’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अल्लूसोबत पूजा हेगडे झळकली होती. या चित्रपटाने 260 कोटींहून अधिक गल्ला कमावला होता. त्यामुळे कार्तिकचा हा रिमेक किती गल्ला कमावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, कार्तिकच्या पोस्टवर अनेक कमेंट येत आहे. खूप फिल्मी आहे, टीपिकल धवन फिल्म, जबरदस्त, मला वाटलं कार्तिक अल्लू अर्जुनची एनर्जी मॅच कार्तिकला मॅच करता येणार नाही. मात्र मी चुकीचा होतो. कार्तिकने मला सरप्राईज केलं’, अशा अनेक कमेंट करत चाहते कार्तिकचं कौतुक करत आहेत.