मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूड मधील अव्वल अभिनेत्यांपैकी एक असलेला कार्तिक आर्यन आता अनेकांच्या मनावर राज्य करतो. एकापेक्षा हिट सिनेमे देत प्रेक्षकांचं मन जिंकून अभिनेता कार्तिक आर्यन यशाच्या शिखरावर पोहचला आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलंय. तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांसोबत काहीना काही शेअर शेरअर करत असतो. अशातच आज कार्तिकचा वाढदिवस असून तो 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिक आर्यनने त्याचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवस साजरा करतानाचे कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये पहिल्या फोटोत कार्तिक केक कट करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये कार्तिकचे आई-वडिल दिसत आहे. सोबतच त्याचा पाळिव कुत्रा कटोरीही फोटोमध्ये आहे. फोटोंच्या मागे ‘लव्ह यू कोकी’ लिहिलेलं दिसतंय.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, “प्रत्येक जन्मात मला तुमचा कोकी म्हणून जन्म घ्यायचा आहे. वाढदिवसाच्या या गोड सरप्राईजबद्दल आई-बाबा, काटोरी किकी धन्यवाद.” कार्तिकच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत. सगळेजण आज कार्तिकवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, ‘भूल भुलैया’नंतर तो कियारासोबत पुन्हा एकदा काम करत आहे. ‘सत्य प्रेम की कथा’ मध्ये दोघे पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. ही एक संगीतमय प्रेमकथा आहे. समीर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पुढील वर्षी 29 जून 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक आर्यन ‘आशिकी 3’, ‘शहजादा’, ‘फ्रेडी’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ हे चित्रपटही करत आहे.
कार्तिकने आत्तापर्यंत ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छुपी’ आणि ‘पति पत्नी और वो’, ‘धमाका’ आणि ‘लव्ह आज कल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले.