जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘बाप रे बाप’, अक्षय कुमारचे 3 नवे अवतार

‘बाप रे बाप’, अक्षय कुमारचे 3 नवे अवतार

‘बाप रे बाप’, अक्षय कुमारचे 3 नवे अवतार

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमाबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या अपकमींग चित्रपटांबाबत सोशल मीडियावरून प्रेक्षकांना माहिती देत असतो. अक्षयचे चाहते ही अक्षयच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात.  नुकतचं अक्षयने त्याचा नव्याने येऊ घातलेला ‘बाप रे बाप’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ट्विटरवर चित्रटाचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, एक से भले दो, दो से भले तीन…..बाप रे बाप, एक मसालेदार मनोरंजन लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. नक्की बघा! #BaapReBaap अक्षय ने शेअर केलेल्या फोटोत, अक्षयचे 3 वेगवेगळे लूक दिसत आहेत. पहिला लूक हा शर्ट आणि पॅन्ट घातलेला तरुण, दुसरा लूक हा कुडता, नेहरू जॅकेट आणि चष्मा घातलेला चाळीशीतला व्यक्ती तर तिसरा लूक हा वयोवृद्ध व्यक्ती असा आहे. तिसरा लूक हा अक्षयचा कुमारचा जुना चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ मधील अक्षयच्या वडिलांच्या भूमिकेशी मिळता जुळता आहे.

जाहिरात

अद्याप, चित्रपटाचा फर्स्ट लूक वगळता चित्रपटातील कास्ट आणि प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आलेली नाही. अक्षय शेवटचा दिग्दर्शक राज मेहता यांच्या ‘Good Newwz’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अक्षयने अभिनेत्री करिना कपूर-खान, अभिनेत्री कियारा अडवानी आणि अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबर  स्क्रीन शेअर केली होती. आता तो दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सुर्यवंशी’(sooryavanshi) आणि राघव लॉरेन्सच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’(Laxmi Bomb) या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सुर्यवंशी चित्रपट 27 मार्चला तर लक्ष्मी बॉम्ब 22 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याव्यतीरिक्त, अक्षय पृथ्वीराज या इतिहासावर आधारित चित्रपटातही दिसणार आहे. 13 नोव्हेंबरला अक्षयचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात