मुंबई, 19 नोव्हेंबर: अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 14’ हा मनोरंजक बनवण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत यात शंका नाही. ‘केबीसी’ गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना केवळ श्रीमंतच करत नाही, तर हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही करतो. या शोमध्ये आतापर्यंत सर्व प्रकारचे स्पर्धक सहभागी झाले आहेत. काहींनीप्रेक्षकांना खळखळून हसवलं तर काहींच्या कहाणीने बिग बींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणलं. अमिताभही या सर्व स्पर्धकांमध्ये अशा प्रकारे मिसळतात की त्यांच्यासमोर बसलेले स्पर्धकही त्यांचे सर्व दु:ख विसरून कोणत्याही दबावाशिवाय हा खेळ खेळतात. आता ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या नवीन एपिसोडमध्ये अजून एक रंजक किस्सा चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपती 14 च्या आगामी एपिसोडमध्ये चक्क कार्तिक आर्यनचा डुप्लिकेट येणार आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसारखा दिसणारा वैभव रेखी केबीसीचा खेळ खेळताना दिसणार आहे. एपिसोडच्या प्रोमोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन त्याला कार्तिकच्या चेहऱ्याशी असलेले त्याचे साम्ययाच्याबद्दल विचारत त्याची चांगलीच मजा घेताना दिसणार आहेत. हेही वाचा - मराठी टेलिव्हिजन ते ‘दृश्यम 2’ मराठमोळ्या अभिनेत्याची गगनभरारी; चाहत्यांकडून होतंय कौतुक सोनी मराठीने नुकताच आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. KBC 14 च्या नवीन एपिसोडच्या प्रोमोमध्ये वैभव रेखी बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसलेला आहे. शोमध्ये त्याची एक व्हिडिओ क्लिप प्ले करण्यात आली आहे ज्यामध्ये वैभव कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ लूकमध्ये दिसत आहे आणि बरेच लोक त्याच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. ही क्लिप पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी वैभवला विचारले- ‘कार्तिक आर्यनची महिला फॅन फॉलोइंग खूप आहे आणि तुझी?’ याला उत्तर देताना वैभव म्हणतो- ‘खरं सांगायचं तर माझीही चांगली फॅन फॉलोइंग आहे. पण माझे ध्येय आधीच निश्चित आहे’.
वैभवचे म्हणणे ऐकून अमिताभ बच्चन समजून घेतात आणि म्हणतात- ‘हे लक्ष्य जवळ आहे, कुठे आहे?’ त्यानंतर वैभवचे उत्तर ऐकून बिग बींनाही हसू आवरता आले नाही. वैभवने हसत हसत उत्तर दिले - ‘ध्येय थोडे दूर आहे, सातासमुद्र आहे.’ यावर अमिताभ म्हणतात- ‘तुम्ही त्याला तिथे कुठे पाठवले?’ तेव्हा वैभव उत्तर देतो ‘ते लक्ष्य आधीच तिथे होते’. स्पर्धकाचे हे बोलणे ऐकून बिग बी देखील मोठ्याने हसतात. इन्स्टाग्रामवर हा प्रोमो व्हिडिओ शेअर करताना, सोनी वाहिनीने कॅप्शन दिलंय कि, ‘‘वैभव जी, तुम्ही लवकर सातासमुद्रापार जावं आणि तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त व्हावे ही प्रार्थना.’
दरम्यान, कार्तिक भूल भुलैया 2 च्या यशाचा आनंद घेत आहे, जो या वर्षातील सर्वाधिक कमाई करणार्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. तो सध्या कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’साठी शूटिंग करत आहे आणि थ्रिलर ‘फ्रेडी’च्या रिलीजसाठी तयारी करत आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 27 मिलियन फॉलोअर्स आहेत.