जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kartik Aryan: सिद्धार्थनंतर आता कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर! सगळ्यांसमोर केली मोठी घोषणा

Kartik Aryan: सिद्धार्थनंतर आता कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर! सगळ्यांसमोर केली मोठी घोषणा

 कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

नुकतंच कार्तिकच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. कार्तिकने खाजगी आयुष्याविषयी मोठी घोषणा केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : बॉलिवूडचा हॅंडसम हंक अभिनेता कार्तिक आर्यन सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चाललेली पहायला मिळत आहे. चाहत्यांमध्ये अभिनेत्याची खूप क्रेझ आहे. या ना त्या कारणामुळे तो कायम चर्चेत असतो. कार्तिकचा नुकताच रिलीज झालेला  ‘शेहजादा’ चित्रपट मात्र प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करू शकला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. आता  अशातच नुकतंच कार्तिकच्या चाहत्यांना  मोठं सरप्राईज मिळालं आहे. कार्तिकने खाजगी  आयुष्याविषयी मोठी घोषणा केली आहे. ‘शेहजादा’ नंतर कार्तिक आर्यनला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. सध्या त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी इतर कोणी नसून खुद्द कार्तिक आर्यनने शेअर केली आहे. खरंतर, कार्तिक आर्यनने झी सिने अवॉर्ड फंक्शन दरम्यान त्याच्या फॅन्ससाठी त्याच्या लग्नाशी संबंधित बातमी शेअर केली आहे. कार्तिक आर्यनने काय घोषणा केली आहे ते जाणून घ्या. Shiv Thakare: बिग बॉसच्या घरातील आपला माणूस पुन्हा जिंकला; शिव ठाकरेने ‘या’ पुरस्कारावर कोरलं नाव कार्तिक आर्यनने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन ड्रमसह झी सिने अवॉर्डच्या मंचावर प्रवेश करत आहे. यानंतर कार्तिक आर्यन म्हणतो, ‘सर्वांना नमस्ते. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मी इथे बँड का आणला आहे. आता बघा ना, बॉलीवूडमध्ये एकामागून एक सर्वांचे बँड वाजत आहेत, सर्व घोडीवर चढत आहेत, सर्वांची विकेट पडत आहेत. आता फक्त मीच सिंगल राहिलो आहे. सगळ्यांचे लग्न पाहून माझ्याही मनात लग्न करण्याची इच्छा निर्माण होत आहे. लग्नाचे लाडू खावेत असं मलाही वाटतंय. मी प्रेमाचा पंचनामा तर केलाच आहे. आता लग्नाचाही पंचनामा करतो.’

जाहिरात

असं म्हणत कार्तिक पुढे म्हणतो कि, ‘तुम्हा सर्वाना साक्षीदार मानून आज मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला ही बातमी देऊ इच्छितो की मी लवकरच लग्न करणार आहे.’  कार्तिक आर्यनच्या या बोलण्याने अवॉर्ड फंक्शनमध्ये उपस्थित असलेले सेलिब्रिटी खूप हसले. कार्तिकने ही घोषणा मजेत जरी केली असली तरी चाहत्यांना मात्र त्याच्या लग्नाची आस लागली आहे. कार्तिकच्या रिलेशनशिपबाबत सांगायचं तर आजवर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीन्सोब्त त्याचं नाव जोडलं गेलं आहे. त्यात सारा अली खानचं नाव सर्वात वरती आहे. तसच नुकतंच तो ह्रितिक रोशनची बहीण पश्मिना सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. त्यामुळे कार्तिक नक्की कोणाशी लग्न करणार हे पाहण्याची आस चाहत्यांना लागुन राहिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट, ‘आशिकी 3’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कार्तिक आर्यन शेवटचा ‘शेहजादा’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात